आयसीसी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी ‘टाटा’कडून मोठ्ठ गिफ्ट; प्रत्येक खेळाडू
महिला क्रिकेटपटूंसाठी टाटा सिएरा कार: भारताच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. महिला विश्वचषक 2025 मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदाच (India beat South Africa first World Cup title) विश्वविजेतेपद पटकावले. 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी मैदानावर खेळल्या गेलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या नावावर केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा ऐतिहासिक पराक्रम साधला. या विजयानंतर टीम इंडियाला आयसीसीकडून 39.55 कोटी रुपये इतकी पारितोषिक रक्कम देण्यात आली, तर बीसीसीआयने देखील संघाला 51 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
टाटा मोटर्सकडून विशेष भेट (टाटा मोटर्स भारताच्या महिला विश्वचषकासाठी नवीन सिएरा एसयूव्ही गिफ्ट करतील)
विश्वचषक विजयानंतर भारतीय महिला संघावर सन्मान आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता टाटा मोटर्सनेही मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी प्रत्येक खेळाडूला आपली नवीन टाटा सिएरा (Tata Sierra) कार भेट देणार आहे. या कारची किंमत सुमारे 12.5 लाख रुपयांपासून सुरू होते. टाटा मोटर्सचे सीईओ शैलेन्द्र चंद्र यांनी सांगितले, “भारतीय संघाने आपल्या अद्वितीय खेळाने आणि ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देशाचे अभिमान वाढवले आहे. त्यांचा प्रवास दृढनिश्चय आणि प्रगतीचे प्रतीक आहे, जो प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो.”
दंतकथा महापुरुषांना भेटतात.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि त्यांच्या दिग्गज ICC महिला विश्वचषकातील कामगिरीचा आनंद साजरा करताना, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स संघातील प्रत्येक सदस्याला टाटा सिएरा – एक धाडसी, बहुमुखी आणि कालातीत दंतकथा अभिमानाने सादर करते.@TataCompanies pic.twitter.com/RxT4viRa9p
— टाटा मोटर्स कार्स (@TataMotors_Cars) ५ नोव्हेंबर २०२५
पंतप्रधान मोदींशी विशेष भेट
विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत खेळाडूंनी त्यांना ‘NaMo 1’ अशी खास जर्सी भेट दिली आणि पंतप्रधानांसोबत संवाद साधला. संघातील प्रत्येक सदस्याचा देशभरात सन्मान होत असून, सर्वत्र त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
भारताचा जबरदस्त विजय
फायनल सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 7 बाद 298 धावा केल्या. प्रत्युत्तर दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.3 षटकांत 246 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने 52 धावांनी हा सामना जिंकून वर्ल्ड कप चॅम्पियन बनण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.