BCCI ची तिजोरी भरणार! टीम इंडियाला मिळाला नवा टायटल स्पॉन्सर, प्रत्येक सामन्यातून 4.85 कोटींची कमाई

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय (ODI) मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या टायटल स्पॉन्सरशिपबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुथूट फिनकॉर्पने (Muthoot Fincorp) पुढील दोन देशांतर्गत हंगामांसाठी भारतीय क्रिकेट संघाचे टायटल स्पॉन्सरशिप हक्क मिळवले आहेत. मात्र, बीसीसीआयने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

हा करार भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेने सुरू होईल, या मालिकेतील पहिला सामना 27 सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायटल स्पॉन्सरशिपबाबतची चर्चा प्रति सामना 4.85 कोटी रुपये या मूळ दराच्या (base rate) आधारावर झाली होती. तथापि, कराराची अंतिम रक्कम या आकड्यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने अधिकृत घोषणा केल्यानंतरच याबद्दलचा अचूक तपशील स्पष्ट होईल.

बीसीसीआयच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी टेंडर्स सादर करण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे बीसीसीआयने संभाव्य कंपन्यांशी थेट चर्चा सुरू केली. यापूर्वी, आयडीएफसी फर्स्ट बँकेकडे (IDFC First Bank) टीम इंडियाचे टायटल स्पॉन्सरशिप हक्क होते आणि ते प्रति सामना 4.2 कोटी रुपये देत होते.

१३ ऑगस्टपर्यंत कोणतीही स्पर्धात्मक बोली (competitive bid) प्राप्त न झाल्यामुळे, बीसीसीआयने संभाव्य भागीदारांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कॅम्पा आणि चॅटजीपीटी यांच्यासोबतच एसबीआय लाइफने बीसीसीआयचे असोसिएट पार्टनर बनण्यासाठी करार केला आहे. हा करार दोन हंगामांसाठी असून तो मार्च 2028 पर्यंत वैध असल्याचे समजते. या नवीन करारामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या कमाईत वाढ होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनुसार, टायटल स्पॉन्सरशिपसाठी प्रति सामना 4.85 कोटी रुपये या मूळ दरावरून चर्चा झाली होती.

मुथूट फिनकॉर्पकडे पुढील दोन देशांतर्गत हंगामांत भारतात खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांचे टायटल हक्क असतील. या कालावधीत सुमारे 35 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 10 कसोटी, 12 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामन्यांचा समावेश असेल.

या कराराची सुरुवात भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेने होईल. विशेष म्हणजे, या मालिकेतील पहिला सामना केरळमधील तिरुवनंतपुरम येथे होणार आहे, जे मुथूट फिनकॉर्पचे मूळ राज्य आहे. 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments are closed.