टीम इंडियाने 2026 मध्ये सोडले तब्बल इतके झेल! काय सांगते आकडेवारी?

क्रिकेटमध्ये एक झेल म्हणजे केवळ एक संधी नसते, तर अनेकदा तो संपूर्ण सामन्याचा निकाल बदलू शकतो. मात्र, 2026 मध्ये टीम इंडियाच्या (Team india) क्षेत्ररक्षणाबाबत समोर आलेली आकडेवारी भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी आहे. भारतीय संघाने यावर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनेक झेल सोडले आहेत. आता ही संख्या समोर आल्यानंतर संघाच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, भारताने 2026 मध्ये आतापर्यंत 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तब्बल 51 झेल सोडले आहेत. या आकडेवारीवरून यावर्षी झेल पकडणे हा टीम इंडियासाठी मोठा कमकुवतपणा ठरला आहे, हे स्पष्ट दिसून येते. टी-20 क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव आणि प्रत्येक गडी बाद होणे महत्त्वाचे असते. अशा वेळी झेल सोडण्याची चूक संघाला महागात पडू शकते.

या आकडेवारीत भारताची तुलना वेस्ट इंडिजशीही करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजची झेल पकडण्याची कार्यक्षमता 75.2 टक्के आहे, तर भारताची 74.3 टक्के आहे. म्हणजेच झेल पकडण्याच्या बाबतीत भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजपेक्षाही मागे आहे.

पूर्ण सदस्य असलेल्या संघांचा विचार केला, तर भारताची कामगिरी आणखी लक्षवेधी ठरते. फक्त पाकिस्तानची झेल पकडण्याची कार्यक्षमता भारतापेक्षा कमी आहे. म्हणजेच पूर्ण सदस्य संघांमध्ये झेल पकडण्याच्या बाबतीत भारताची कामगिरी खालच्या क्रमांकावर राहिली आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) छोटीशी चूकही सामन्याचा प्रवाह बदलू शकते. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये टीम इंडियाला झेल पकडण्यासह संपूर्ण क्षेत्ररक्षणावर विशेष लक्ष द्यावे लागेल. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच मैदानावर मिळालेल्या संधींचा योग्य फायदा घेणेही विजयासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. 2026 मध्ये 51 झेल सोडल्याची आकडेवारी टीम इंडियासाठी निश्चितच क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याचा इशारा देणारी आहे. त्यामुळे आगामी वेस्टइंडिज विरूद्ध मालिकेत टीम इंडियाने क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करणे अपेक्षित आहे.

Comments are closed.