यशस्वी जैस्वाल OUT, विराट कोहली IN….; इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा असणार टीम इंडिया
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ अपडेट: भारतीय क्रिकेट संघ आगामी जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तिथे 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. 14 जुलै ते 16 जुलै 2026 दरम्यान होणाऱ्या या मालिकेसाठी पुढील 2-3 दिवसांत भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात स्टार फलंदाज शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेत सलामीच्या स्थानासाठी अनुभवी रोहित शर्मा आणि युवा यशस्वी जैस्वाल यांच्यात चुरस पाहायला मिळेल. शुभमन गिलसोबत रोहित शर्मा डावाची सुरुवात करण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, आयपीएल 2026 च्या फायनलमध्ये आरसीबीला (RCB) विजय मिळवून दिल्यानंतर विराट कोहलीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला मुकला होता. इंग्लंड दौऱ्यात खेळण्यापूर्वी विराटला ‘बीसीसीआय’च्या सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) मध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागेल. दुसरीकडे, दुखापतीमुळे हार्दिक पांड्या या मालिकेतून बाहेर राहण्याची शक्यता आहे, तर विश्रांतीनंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज संघात पुनरागमन करतील.
टॉप ऑर्डर अन् मिडिल ऑर्डर तगडी (Team India ODI Squad For England Tour)
संघाची धुरा शुभमन गिलकडे असेल. सलामीसाठी त्याच्यासोबत रोहित शर्मा आणि शुभमन गिलकडे असतील. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध आता शतक ठोकल्यानंतरही यशस्वी जैस्वाल बाहेर जाऊ शकतो. कारण तिसऱ्या क्रमांकावर रनमशीन विराट कोहली फलंदाजीची धुरा सांभाळेल. मध्यम फळी मजबूत करण्यासाठी श्रेयस अय्यर, ईशान किशन आणि केएल राहुल सज्ज असतील.
ऑलराउंडर्स अन् घातक गोलंदाजी
तर वेगवान गोलंदाज-ऑलराउंडर म्हणून नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांना संधी मिळू शकते. राहुल आणि ईशान यष्टीरक्षकाची भूमिकाही बजावतील. फिरकीची जबाबदारी अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांच्यावर असेल. तर वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या सोबतीला अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा असतील.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संभाव्य 15 सदस्यीय संघ (Team India ODI Squad For England Tour) : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
इंग्लंड-भारत मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक (England-India ODI series Schedule)
- पहिला वनडे : 14 जुलै (दुपारी 3:30 वाजता, एजबेस्टन, बर्मिंघम)
- दुसरा वनडे : 16 जुलै (संध्याकाळी 5:30 वाजता, सोफिया गार्डन्स, कार्डिफ)
- तिसरा वनडे : 19 जुलै (दुपारी 3:30 वाजता, लॉर्ड्स, लंडन)
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.