गिरीश महाजनांच्या ‘त्या’ तरुण मुलीसोबतच्या फोटोंबाबत मोठी अपडेट, सायबर सेलकडून स्पष्टीकरण, म्हण

गिरीश महाजनचे मुलीसोबतचे फोटो: राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आक्षेपार्ह फोटो हे मूळ नसून, त्यात मोठ्या प्रमाणावर फेरफार आणि छेडछाड करण्यात आल्याचे आता अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने (Maharashtra State Cyber Department) या छायाचित्रांचे सखोल तांत्रिक विश्लेषण पूर्ण केले असून, हे फोटो बनावट असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र जारी केले आहे. या सायबर अहवालामुळे गिरीश महाजन यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांची बदनामी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Girish Mahajan Photos with Girl: गिरीश महाजनांचे फोटो केले ‘मॉर्फ’

काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे काही आक्षेपार्ह फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, तपासात समोर आले आहे की, फोटोशॉप आणि अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून गिरीश महाजन यांचा तरुण मुलीसोबतच्या फोटोंमध्ये छेडछाड करून ते मॉर्फ करण्यात आले होते. या प्रकरणी मंत्री महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) अमोल शरद पाटील यांच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी वेगाने पावले उचलली. याप्रकरणी BNS, IT ॲक्ट आणि महिलांचे अश्लील चित्रण प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Girish Mahajan Photos with Girl: छायाचित्रांमध्ये फेरफार व बदल

आता व्हायरल करण्यात आलेल्या छायाचित्रांचे तांत्रिक विश्लेषण पूर्ण झाले आहे. सायबर पोलिसांच्या तपासात संबंधित छायाचित्रांमध्ये फेरफार व बदल केल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र राज्य सायबर विभागाकडून याबाबत अधिकृत प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलीस करत असून या सायबर अहवालामुळे गिरीश महाजन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Girish Mahajan Photos with Girl: गिरीश महाजनांनी केली होती सखोल चौकशीची मागणी

या संपूर्ण प्रकरणावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली होती. “मला माहिती नाही हे फोटो कसे मॉर्फ करण्यात आले. मी याबाबत सविस्तर खुलासा करणार आहे. मी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. फोटो मॉर्फिंग करून ते दाखवले जात आहेत, सेल्फी दाखवले जात आहेत. पण ते मॉर्फिंग केलेले आहेत. मी यासंदर्भात सखोल चौकशीची मागणी केली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली होती.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Girish Mahajan viral photos with Girl: मॉर्फ फोटोतील ती तरुणी मित्राची मुलगी, गिरीश महाजनांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत काय सांगितलं?

Comments are closed.