ओमदादा राज्यातील तमाम शिवसैनिकांची भावना तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहावं : प्रवीण स्वामी

ओमराज निंबाळकर प्रविण स्वामी मुंबई/ धाराशिव : ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नसून मतदारसंघात गोवर्धनवाडी येथे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेतल्याचं म्हटलं. ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरुच ठेवण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय आमदार कैलास पाटील आणि आमदार वरुण सरदेसाई देखील त्यांना काल रात्री उशिरा भेटले होते. आता ठाकरेंच्या सेनेचे उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी ओमराजे निंबाळकर यांना भावनिक साद घातली आहे. ओमदादा तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेत राहावं ही महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांची भावना असल्याचं प्रवीण स्वामी म्हणाले.

Omraje Nimbalkar Pravin Swami : ओमदादांनी निर्णय घेतलेला नाही : प्रवीण स्वामी

आमदार प्रवीण स्वामी म्हणाले गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भोवतीनं फिरतंय. सहा खासदारांच्या बाबतीत चर्चा सुरु आहे. जेव्हा जेव्हा आम्ही आमचे आदरणीय ओमदादा निंबाळकर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अंतिम निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं. आमच्या सर्वांचीच इच्छा आहे की दादांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहावं. कारण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व शिवसैनिकांची, धाराशिवच नाही तर  तमाम महाराष्ट्रातील शिवसैनिकांची ही भावना आहे, असं प्रवीण स्वामी म्हणाले.

आम्ही पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, कैलास पाटील आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व नेत्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर खूप प्रेम केलंय. दादांना सगळ्यांच्या वतीनं विनंती असेल, आपण कृपया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहावं ही सगळ्यांचीच भावना आहे. मी देखील तुम्हाला विनंती करतोय, असं प्रवीण स्वामी यांनी म्हटलं.

ओमदादांनी पक्षासोबत राहावं : प्रवीण स्वामी

प्रवीण स्वामी म्हणाले की  आम्ही ओमराजे यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की मी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.   ओमदादांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत राहावं.. शिवसैनिकांची देखील हीच भावना आहे.. आम्हीपण दादा असतील , उद्धवसाहेब असतील किंवा आमदार कैलास पाटील असतील यांनी पक्षावर प्रेम केले.  आमची दादांना विनंती असेल, दादा यांनी पक्षासोबत राहावे, असं प्रवीण स्वामी म्हणाले.

दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज मतदारसंघात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं. आज चर्चा कर किंवा उद्या निर्णय घेऊ असंही ते म्हणाले.

हेदेखील वाचा

Comments are closed.