टीम इंडियाला मिळणार नवा टी-20 कर्णधार; श्रेयस अय्यरचं नाव जवळपास निश्चित, तिलक-ईशान उपकर्णधारपद

टीम इंडियाचा T20 कर्णधार: टी-20 विश्वचषक 2026 आणि आयपीएल 2026 मधील सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खराब फॉर्ममुळे भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. याचदरम्यान, टीम इंडियाच्या नवीन टी-20 कर्णधारपदाच्या (Team India T20 Captain) शर्यतीत श्रेयस अय्यर आघाडीवर आहे, तर तिलक वर्मा (Tilak Verma) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांना उपकर्णधारपदाचे दावेदार मानले जात आहे.

आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या भारतीय संघाच्या पुढील टी-20 मालिकेपूर्वी नवीन कर्णधार मिळणार असल्याचं बोललं जात आहे. या शर्यतीत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सर्वात प्रबळ दावेदार म्हणून समोर आला आहे. पुढील दोन टी-20 विश्वचषक लक्षात घेता, निवड समितीचे प्राधान्य केवळ दीर्घकाळ टिकणाऱ्या कर्णधाराची निवड करणे हेच नाही, तर संघाचे दीर्घकाळ नेतृत्व करू शकणाऱ्या खेळाडूची निवड करणे हे देखील आहे. कर्णधारपादासाठी तिलक वर्मा आणि ईशान किशन यांचाही निवड समितीकडून विचार केला जात आहे. मात्र श्रेयस अय्यर सध्या आघाडीवर असून तिलक वर्मा आणि ईशान किशन या दोघांमधून एका खेळाडूला उपकर्णधारपद दिले जाण्याची शक्यता आहे. (Team India T20 Captain)

सूर्यकुमार यादवच्या खराब फलंदाजीमुळे बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत- (Team India T20 Captain)

आयपीएल (IPL 2026) संपताच टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदाची (Team India T20 Captain) जबाबदारी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे सोपवण्याबाबत बीसीसीआय विचार करत आहे. टी-20 संघाचा सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खराब फलंदाजीमुळे बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.  सूर्यकुमार यादवला 2025 मध्ये एकही अर्धशतक झळकवता आले नाहीय. तसेच टी-20 विश्वचषकातही तो चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाला खराब फॉर्मचा फटका बसू नये, त्यामुळे बीसीसीआयमध्ये सूर्यकुमार यादवला हटवण्याबाबत चर्चा सुरु आहे. रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्यासारखा पर्यात असताना रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या शिफारशीवरुन सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती.

IPL च्या पलीकडेही श्रेयस अय्यर एक उत्कृष्ट कर्णधार- (Shreyas Iyer)

श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाबाबत होणारी प्रशंसा केवळ ‘इंडियन प्रीमियर लीग’पुरतीच मर्यादित नाही. 2024 मध्ये, मुंबईने आपल्या इतिहासात दुसऱ्यांदा ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’ जिंकली—हा एक ऐतिहासिक विजय होता, जो श्रेयस अय्यरच्याच कर्णधारपदाखाली साकार झाला. असे दिसून येते की, कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच, अय्यरची वैयक्तिक कामगिरीही बहरते; किंबहुना, ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’च्या (SMAT) त्याच हंगामात, त्याने 9 सामन्यांमध्ये एकूण 345 धावा कुटल्या होत्या. 2018-19 च्या देशांतर्गत हंगामात त्याने मुंबई संघाचे नेतृत्व केले होते. शिवाय, त्याने ‘इंडिया-ए’ (India ‘A’) संघाचेही नेतृत्व केले असून, त्या भूमिकेतही त्याने लक्षणीय यश संपादन केले आहे. अशा प्रकारे, हे स्पष्ट होते की श्रेयस हा केवळ IPL च्या झगमगाटातच एक असाधारण कर्णधार ठरलेला नाही.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Sairaj Bahutule Team India New Spin Coach: टीम इंडियात मराठमोळ्या कोचची एन्ट्री; गौतम गंभीरसोबत करणार काम, BCCI ची घोषणा

आणखी वाचा

Comments are closed.