जालन्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्लाबोल, ऑईल व सुपारी फेकून निषेध

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टिका करणार्‍या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ऑईलसह सुपारी फेकत जोरदार निषेध आंदोलन केले. ही घटना शहरातील विशाल कॉर्नर येथे घडली असून, काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अ‍ॅड. सदावर्ते हे आज ९ मे रोजी जालना जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांच्या ताफ्याला विशाल कॉर्नर परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी अडवले. काही दिवसांपूर्वी सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सदावर्ते यांच्या वाहनावर ऑईल आणि सुपारी फेकली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलन करणार्‍या काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

घटनेनंतर विशाल कॉर्नर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे जालन्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, शहरात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.

Comments are closed.