काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्याचा खात्मा.
चकमकीनंतर एके रायफल जप्त
वृत्तपत्र / श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील बडगाम जिह्यातील घनदाट जंगलात लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. चकमकीनंतर दहशतवाद्याकडील एके रायफल आणि अन्य दस्तावेज जप्त करण्यात आला. सुरक्षा दलांना संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे सुरक्षा दलांना प्रत्युत्तर द्यावे लागले. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.
चकमकीनंतर परिसरात दक्षता वाढवण्यात आली आहे. जंगलभागात शोधमोहीम सुरू असून सुरक्षा दल आजूबाजूच्या परिसरातही लक्ष ठेवून आहे. आणखी एक दहशतवादी परिसरात लपून बसल्याचा संशय आहे. त्याला पकडण्यासाठी सुरक्षा दल आपली शोधमोहीम सुरू ठेवत असून, आजूबाजूच्या जंगलांमध्येही व्यापक शोध घेतला जात आहे. अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर खोऱ्यातील ही अशा प्रकारची पहिलीच चकमक आहे.
Comments are closed.