दिल्लीत दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश
पाकिस्तानी कनेक्शन आले समोर : 7 जणांना अटक
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने राष्ट्रीय राजधानीत सक्रीय पाकिस्तानचे समर्थनप्राप्त एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा करत 7 दहशतवाद्यांना अटक केली आहे. पाकिस्तानातील हँडलर शहजाद भट्टी आणि त्याचा साथीदार अजमल गुज्जरच्या इशाऱ्यावर हे दहशतवादी देशात अशांतता निर्माण करण्यासाठी शस्त्रास्त्रांची तस्करी करत होते. या दहशतवाद्यांना पाकिस्तानी शस्त्रास्त्रs सीमेपलिकडून ड्रोनद्वारे पुरविण्यात येत होती. नेटवर्कला पाकिस्तानातून अमली पदार्थांचा पुरवठाही प्राप्त व्हायचा.
दहशतवाद्यांचे हे जाळे पंजाबमार्गे पाकिस्तानातून अवैध शस्त्रास्त्रs, दारूगोळा आणि अमली पदार्थांची तस्करी करत होते. पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून 5 बंदुका, काडतूसे, 7 मोबाइल फोन आणि एक वाहन हस्तगत केले आहे. या दहशतवादी नेटवर्कमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याचा संशय आहे.
हे दहशतवादी नेटवर्क युवांची दिशाभूल करत त्यांना देशविरोधी कारवायांमध्ये सामील करत होते. याकरता हे दहशतवादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत होते. देशाच्या युवांना मोठ्या कमाईचे आमिष दाखविले जात होते. युवांना गुन्हेजगताचे ग्लॅमर दाखवत त्यांना शस्त्रास्त्र तसेच अमली पदार्थाच्या तस्करीत सामील केले जात होते.
Comments are closed.