काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनामुळे दहशतवाद्यांनी हाहाकार माजवला.
न्यूजपेपर सोसायटी, श्रीनगर
काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांसाठी (पीएम पॅकेज कर्मचाऱ्यांसाठी) तयार करण्यात येणाऱ्या ट्रान्झिट निवासस्थानांवरून दहशतवादी संघटनांकडून पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. युनायटेड लिबरेशन कौन्सिल (यूएलसी) नावाच्या दहशतवादी संघटनेने एक धमकीचे पत्र जारी करत काश्मिरी पंडित अणि खोऱ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या वसाहतींना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
पत्रात सरकारी ट्रान्झिट कॉलनींची तुलना इस्रायली वसाहतींशी करत त्यांना काश्मीरविरोधी घडामोडींचे केंद्र ठरविण्यात आले आहे. दहशतवादी संघटनेने काश्मिरी पंडितांवर बिनबुडाचे आरोप करत गंभीर परिणाम भोगण्याची आणि गोळी घालण्याची धमकी दिली आहे.
आमच्याकडे कर्मचारी आणि त्यांच्या परिवारांच्या वास्तव्यस्थानाची पूर्ण माहिती असल्याचा दावा दहशतवादी संघटनेने केला आहे. या धमकीच्या पत्रासोबत जम्मू-काश्मीर प्रशासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्या काही अधिकृत पत्रव्यवहारांच्या प्रतीही संलग्न करण्यात आल्या आहेत, जे विविध स्थानांवर ट्रान्झिट कॉलनींच्या हँडओव्हर आणि सुरक्षा व्यवस्थेशी निगडित आहेत. सोशल मीडियावर धमकीचे हे पत्र समोर आल्यावर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच पत्राच्या सत्यतेच्या तपासणीसोबत काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची समीक्षा करण्यात येत आहे.
काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांनी सुरक्षित ट्रान्झिट निवास मिळावा म्हणून काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये आंदोलन पेले होते. कर्मचाऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून मागणी पूर्ण न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून आंदोलन आणि उपोषणाचा इशारा दिला आहे.
उपलब्ध माहितीनुसार 6 हजार ट्रान्झिट फ्लॅट्सच्या उद्दिष्टापैकी 4,648 फ्लॅट्स पूर्ण झाले आहेत, मात्र त्यापैकी केवळ 881 फ्लॅट्समध्ये कर्मचाऱ्यांच्या परिवारांनी राहण्यास सुरुवात केली आहे. तर अनेक कर्मचारी अद्याप भाड्याच्या घरांमध्ये राहत आहेत.
Comments are closed.