ठाण्यात अभिनेत्रीला सेक्स रॅकेटप्रकरणी अटक
ठाणे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सेक्स रॅकेटप्रकरणी एका अभिनेत्रीला अटक केली आहे. तिच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. संबंधित अभिनेत्रीने हिंदीतील सुमारे दहा वेबसिरिज तसेच तीन भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
वागळे इस्टेट परिसरातील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये काही महिला व मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणले जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शनिवारी दुपारी ३ वाजता संबंधित ठिकाणी सापळा रचला. अभिनेत्री बार रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच पोलिसांनी कारवाई करत तिला ताब्यात घेतले. यावेळी तिच्या संपर्कात असलेल्या दोन महिलांचीही सुटका करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
रोख रक्कम, आयफोन लंपास
खोपट येथील साऊथ इंडियन फूड हॉटेलमध्ये आलेल्या दोन महिलांनी कॅशिअरचे लक्ष विचलित करून पर्समधील ४ हजार ५०० रुपये रोख आणि आयफोन असा एकूण ५९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. महिलेने तिच्यासोबत असलेल्या मुलीला हॉटेलमध्ये बसवून दुसऱ्या महिलेसह प्रवेश केला. कॅशिअर इतर कर्मचाऱ्यांना बोलविण्यासाठी गेल्याची संधी साधून दोघींनी ऐवज लंपास केल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Comments are closed.