शॉकिंग! उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनीत गोळीबार अन तलवारीनं हल्ला, दोघे गंभीर जखमी, पोलिस पथकं अलर्
ठाणे गुन्हे: उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून दुसऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथ कॉलनी परिसरात घडली. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कौटुंबिक वादातून ताण वाढला
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि पीडित कुटुंबातील वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. सोमवारी रात्री अचानक तणाव वाढला आणि वाद चिघळताच आरोपींनी शस्त्रांचा वापर करून हल्ला केला. यामध्ये एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला, तर दुसऱ्याला तलवारीने वार करून जखमी केले. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याला तात्काळ ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या जखमीवरही उपचार सुरू आहेत.
पोलिसांचा तपास आणि हल्लेखोरांचा शोध
घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.या संदर्भात डीसीपी सचिन गोरे म्हणाले कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. आम्ही आरोपींची ओळख पटवली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. या घटनेनंतर उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास हिललाइन पोलिसांकडून सुरू आहे.
बदनामी झाल्यानं अल्पवयीन मुलीनं गळ्याला लावला दोर
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून तसेच इन्स्टाग्रामवर फोटो ठेवून बदनामी झाल्यामुळे विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. दोघे संशयित कॉलेजमध्ये वेळोवेळी येऊन तिला आरोपी सोबत जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडत होते.
आणखी वाचा
Comments are closed.