लॉजमध्ये गेले, प्रियकराने प्रेसयीसोबत उशीने नको नको ते केले; ठाण्यातील हादरवणारी घटना
ठाणे क्राईम न्यूज : ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराजा हॉटेल लॉज या ठिकाणी प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याने एकच खळबळ (Thane Crime Marathi News) उडाली आहे. उशीच्या सहाय्याने तोंड दाबून प्रियकराने प्रेयसीला संपवल्याचं समोर आलं आहे.
नंदकिशोर गाडेकर वय 27 वर्षे हा विष्णू नगर डोंबिवलीचा रहिवासी असून आरोपीला ठाणे नगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव संध्या म्हस्के वय वर्षे 23 असून ती भांडुपची रहिवासी आहे. दोघांचे गेल्या 4 वर्षांपासून प्रेम संबंध होते, मात्र हत्या करण्यामागचे कारण ठाणे नगर पोलीस तपास करत आहे. (Thane Crime News)
जालन्यात लहान मुलांच्या भांडणाचे हिंसक वळण, 18 वर्षीय तरुणाची हत्या- (Jalna Crime News)
जालना शहरात लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील वाल्मीक नगर परिसरात दुपारच्या सुमारास किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष काही वेळातच हिंसक वळणावर गेला. या हाणामारीदरम्यान लोखंडी रॉड आणि तलवारींचा वापर झाल्याची प्राथमिक माहितीसमोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सय्यद अहमद रियाज या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत दोन महिलाही जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केले असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून , खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पतीच्या छळाला कंटाळून महिलेने 10 महिन्यांच्या लेकीची केली हत्या- (Solapur Crime News)
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत माणुसकी सुन्न करणारी घटना घडली आहे. पतीच्या छळाला कंटाळलेल्या एका महिलेने आपल्या अवघ्या 10 महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर या आईने सहा वर्षांच्या मोठ्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, “आई… मी शाळा शिकते, मला मारू नकोस,” अशी आर्त विनवणी मुलीने करताच तिचा जीव बचावला. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी महिला मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली आणि “माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलीची हत्या केली आहे. मला अटक करा,” अशी कबुली पोलिसांसमोर दिली.
आरोपी महिलेचे नाव पूजा योगेश खुर्दामळे (वय 26) असून मृत चिमुकलीचे नाव शक्ती (वय १० महिने) आहे. तर मोठी मुलगी तेजल (वय 6 वर्षे) सुदैवाने बचावली. मोठी मुलगी तेजल हिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. वडील कामावर गेल्यानंतर आईने आधी लहान बहिणीचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवले. त्यानंतर माझाही गळा दाबण्याचा आणि तोंडावर उशी दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, “आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस,” असे म्हणाल्यानंतर आईने मला सोडून दिले, अशी माहिती तेजलने पोलिसांना दिली. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी पूजा खुर्दामळे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि १०९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा:
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Comments are closed.