व्हॉट्सअॅपवर तरुणींचे फोटो पाठवून सौदे, पोलिसांनी हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला अन्…; ठाण्य
ठाणे गुन्हे: ठाणे शहरातील ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठं देहविक्रीचं रॅकेट उघडकीस आले आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई करत एक दलाल महिलेला अटक केली असून तिच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. संबंधित महिला सोशल मीडियाचा वापर करून देहविक्रीचे रॅकेट चालवत होती.
Thane Crime: व्हॉट्सअॅपवरून तरुणींचा फोटो पाठवून सौदे
सदर आरोपी महिला व्हॉट्सअॅपवरून तरुणींचे फोटो पाठवून ग्राहकांशी संपर्क साधायची आणि सौदे निश्चित करत होती. सौदा पक्का झाल्यानंतर ती स्वतः तरुणींना घेऊन ठरलेल्या हॉटेलमध्ये पोहोचायची, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिच्यावर लक्ष ठेवून कारवाईचे नियोजन केले.
Thane Crime: रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचून अटक
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या सहाय्याने सापळा रचला.
बनावट ग्राहकाने दलाल महिलेशी संपर्क साधल्यानंतर तिने दोन तरुणींना घेऊन हॉटेलमध्ये येण्याचे कबूल केले. त्यानंतर तिने एका तरुणीचा सौदा 8,000 रुपये इतक्या रकमेत ठरवला. यातील 3,000 रुपये पीडित महिलेला देण्यात येणार होते, तर उर्वरित 5,000 रुपये आरोपी महिला स्वतःकडे ठेवणार होती, अशी कबुली तिने पोलिस चौकशीत दिली आहे.
Thane Crime: गुन्हा नोंद, अधिक तपास सुरू
सापळा यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी सदर दलाल महिलेला अटक केली असून तिच्यावर ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस सध्या आरोपीचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप चॅट तपासून ग्राहकांची माहिती तसेच या रॅकेटमधील इतर सहभागींचा शोध घेत आहेत. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि आणखी काही अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी अशा प्रकारच्या रॅकेटबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.