मालमत्तेच्या वादातून सावत्र भावाला संपवलं, मृतदेह जंगलात सापडला; ठाणे हादरलं
ठाणे गुन्हे: राज्यात गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला आहे . हत्या, खून, दरोडे,लैंगिक अत्याचारासारख्या घटना वारंवार समोर येत असताना ठाण्यातील एका गावात संपत्तीच्या वादातून सावत्र भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . 29 मे रोजी गावातील जंगल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शीर नसलेल्या अवस्थेत आढळला होता .पीडित तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियासह व्हाट्सअप ग्रुप वर आहे मोठ्या प्रमाणावर फिरत होता . या घटनेच्या तपासांतर्गत आता आरोपी सलमान मोहम्मद गौरी अन्सारी या 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे .
नेमके प्रकरण काय ?
ठाण्यातील एका गावात सावत्र भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला .शुक्रवारी फैजल मोहम्मद गौरी अन्सारी या 29 वर्षीय तरुणाची हत्या करत त्याचा मृतदेह नालिंबी गावात फेकल्याबद्दल पोलिसांनी सलमान मोहम्मद गौरी अन्सारी या 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे .आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार,29 मे रोजी गावातील जंगल परिसरात एका अज्ञान व्यक्तीचा मृतदेह आढळला.त्यानंतर पोलीस पथकाने केलेल्या तपासानुसार सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.दरम्यानच्या काळात पोलीस ठाण्यामधील बेपत्ता व्यक्तींच्या अहवालाशी ही फुटेज जुळवण्यात आले.पीडित व्यक्तीचा फोटो तोपर्यंत व्हाट्सअप ग्रुप वरही मोठ्या प्रमाणात फिरत होता.तपास पथकाने घटनास्थळाजवळ असणारी एक अज्ञात कार ओळखली.त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.आरोपी टिटवाळा येथे मांडा भागातील रहिवासी होता.आरोपीने त्याचा सावत्र भाऊ फैजल याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.दोन्ही भाऊ अनेकदा मालमत्तेवरून भांडत असत.या वादातूनच गौरी अन्सारी याने फैजलची हत्या केली असल्याचा समोर आलं आहे .
‘टकल्या’ने काढला जिवलग मित्राचा काटा
अकोला शहरातील रमाबाई नगर (Ramabai Nagar) परिसरात एका धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाश पंचू जोसेफ (वय अंदाजे 35) या युवकाची त्याच्या जवळच्या मित्रानेच निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पवन विलास मोरे उर्फ ‘टकल्या’ (रा. अकोला) असे आरोपीचे नाव असून, तो सध्या फरार आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Akola Crime News)याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि पवन हे दोघेही चांगले मित्र होते. मंगळवारी रात्री ते रमाबाई नगर चौकात एकत्र दारू पीत होते. दरम्यान, त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली. त्यातूनच पवन उर्फ ‘टकल्या’ने अचानक रागाच्या भरात प्रकाशवर दगडाने वार केले. या हल्ल्यात प्रकाश गंभीर जखमी झाला.
हेही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.