ठाण्याच्या प्रतिभा-तन्वीची सुवर्णभरारी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ठाण्याच्या प्रतिभा लोणे आणि तन्वी शिंदे यांनी पॉवरलिफ्टिंगच्या मैदानावर आपला दमदार ठसा उमटवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभाने कांस्यपदकाची कमाई केली, तर राष्ट्रीय स्पर्धेत तन्वीने सुवर्णपदकासह ‘सेपंड बेस्ट लिफ्टर’ किताब पटकावला.

तुकाaतील इस्तंबूल येथे झालेल्या वर्ल्ड ओपन इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिभाने महिलांच्या ओपन 84 किलो गटात 532.5 किलो वजन उचलले. स्क्वॉटमध्ये 242.5 किलो वजनासह कांस्यपदक मिळवताना तिने जागतिक क्रमवारीत आठवे स्थान मिळवले. त्यानंतर 23 नोव्हेंबरला छत्तीसगडमधील दुर्ग येथे फेडरेशन कपमध्ये 535 किलो वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरले. प्रशिक्षक अनंत चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी प्रतिभा 1 ते 10 डिसेंबरदरम्यान मंगोलियातील उलानबातार येथे होणाऱया आशियाई अजिंक्यपदासाठी सज्ज आहे.

दुसरीकडे तन्वीने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या ओपन 63 किलो गटात 477.5 किलो वजन उचलत सुवर्णपदक जिंकले. 192.5 किलो स्क्वॉट, 112.5 किलो बेंच प्रेस आणि 172.5 किलो डेडलिफ्ट अशी तिची कामगिरी राहिली. या दमदार प्रदर्शनासाठी तिला ‘सेपंड बेस्ट लिफ्टर’ किताबाने गौरविण्यात आले.

Comments are closed.