धक्कादायक! मोबाईलसाठी चोरट्यानं फटका मारला, प्रवासी रेल्वेतून खाली पडला, 20 हजार घेऊन चोर पळाला
ठाणे कल्याण बातम्या: आंबिवली आणि शहाड रेल्वे स्थानकादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. मेल एक्सप्रेसच्या दारावर उभा असलेल्या एका प्रवाशाला चोरट्याने फटका मारुन मोबाईल हिसकावल्याची घटना घडली आहे. यावेळी प्रवासी खाली पडल्याने त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून, एक पाय गमावल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चोरटा एवढेच करुन थांबला नाही तर जखमी अवस्थेत असलेल्या प्रवासाचे 20 हजार देखील लुटले आहेत. गौरव रामदास निकम असे जखमी प्रवाशाचे नाव आहे.
अवघ्या काही तासातच अल्पवयीन इराणी चोरट्याला अटक
दरम्यान, या घटनेप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अवघ्या काही तासातच अल्पवयीन इराणी चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलाविरोधात या आधी देखील चार ते पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रेल्वे जीआरपीकडून देखील तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळं प्रवाशांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. कारण चोरटे कधीहीआणि कुठेही खुलेआम चोऱ्या करत असल्याचे प्रकार घडत आहेत. अशळा चोरट्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असी मागणी देखील नागरिक करत आहेत.
मागील वर्षी इराणी वस्तीमध्ये पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना
दरम्यान, मागील वर्षी इराणी वस्तीमध्ये पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना देखील घडली होती. इराणी वस्तीमधील गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस आले की, त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रकार अनेक दिवसांपासून सुरु आहेत. हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर ते जामिनावर बाहेर येतात. मात्र, पुन्हा एकदा ते या गुन्हेगारीकड वळतात. ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये गुन्हेगारांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर वारंवार हल्ले होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील कुप्रसिद्ध इराणी वस्ती ही पोलिसांवर हल्ले करण्यासाठी कायम चर्चेत असते.
या वस्तीमध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर
दरम्यान, या वस्तीमध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आले आहे. गुन्हेगार पडीक आणि वापरात नसलेल्या इमारतींमध्ये लपतात, त्यामुळे अशा बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या वस्तीबाबत गृहराज्यामंतच्री योगेश कदम यांनी गेल्या तीन महिन्याखाली गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच, सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी एटीएसचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीदिली होती.
महत्वाच्या बातम्या:
Baramati Crime : धावत्या एसटीमध्ये प्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आधी शेजारी बसलेल्यावर वार केला, नंतर आरोपीने स्वतःलाही…; बारामती हादरली
आणखी वाचा
Comments are closed.