आव्हाडांना मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या पुरस्कृत नगरसेविका प्रमिला केणी यांचा शिवसेनेला पाठिंबा
ठाणे : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने वर्चस्व गाजवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदाच्या मुद्यावरुन पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हड यांना मोठा धक्का बसला आहे. कळव्यातील अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. प्रमिला केणी यांनी राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांचा प्रचार स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.
प्रमिला केणी राष्ट्रवादीतून सेनेत आल्या होत्या, मात्र त्यांना तिकीट डावलल्यानं अपक्ष
आज कोकण भवन इथे शिवसेनेच्या 75 नगरसेवकांसोबत उपस्थित राहून पाठिंब्याचे पत्र दिले आहे. प्रमिला केणी या राष्ट्रवादीतून सेनेत आल्या होत्या, मात्र त्यांना तिकीट डावलले होते, त्यामुळं त्यांनी बंडखोरी करुन शिवसेनेच्याच मनाली पाटील यांचा पराभव केला. महत्वाचे हे आहे की प्रमिला केणी यांच्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या पक्षातील दीपा गावंड यांना माघार घ्यायला लावली होती आणि प्रमिला केणी राष्ट्रवीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढल्या होत्या, त्यांचा प्रचार स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. मात्र, त्यामुळं आज त्यांनी सेनेला पाठिंबा दिल्याने हा जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का मानला जात आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या 2017 मध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांना शिवसेना शिंदे पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारीच्या दिवशी केणी या अर्ज माघारीसाठी गेल्या असता, त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपा गवंड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर प्रमिला केणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत केले होते. शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांच्यासाठी सभा घेतली होती. अतिशय चुरशीच्या झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 मधून प्रमिला केणी या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
Municipal Corporation Reservation 2026: मुंबई, पुणेपासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आरक्षण जाहीर; तुमचा महापौर कोण, संपूर्ण यादी
आणखी वाचा
Comments are closed.