‘ठाण्यात शिंदे गटाशी युती नको’ भाजप पदाधिकारी इरेला पेटले, थेट जिल्ह्याध्यक्षांना धाडलं पत्र; म
ठाणे निवडणूक भाजपा विरुद्ध शिवसेना: राज्यात महायुतीच्या (Mahayuti) माध्यमातून महापालिका निवडणुका लढवण्याची अधिकृत घोषणा झालेली असली, तरी ठाण्यातील भाजपमध्ये (BJP) या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी उफाळून आली आहे. “आम्हाला युती नको, स्वबळावरच लढा,” अशी आक्रमक भूमिका ठाण्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार व जिल्हाध्यक्षांकडे मांडली आहे. या नाराजीमुळे महायुतीसमोर ठाण्यात मोठे आव्हान उभे राहिले आहे.
ठाण्यातील नाराजीनाट्याची मूळ कारणे मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या भाजप-शिवसेना संघर्षाशी संबंधित आहेत. दोन्ही पक्षांनी “स्वबळावर लढा” या नाऱ्याखाली कार्यकर्त्यांना मोर्चेबांधणीसाठी प्रेरित केले होते. अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली गेली होती, त्यामुळे अचानक युती जाहीर झाल्याने अनेक इच्छुक कार्यकर्त्यांची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली.
Thane Election BJP Vs Shiv Sena: 18 प्रांत अध्यक्षांनी धाडले पत्र
ठाण्यातील 18 प्रांत अध्यक्षांनी एकमताने युती नको, असे पत्र जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक आमदारांकडे सादर केले. पत्रातून त्यांनी म्हटले आहे की, युतीमुळे भाजपला नुकसान होऊ शकते, तसेच आम्ही स्वबळावर लढण्याची ताकद राखतो. मागील काळात कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षाची आठवण ठेवा, असेही पत्रातून वरिष्ठ नेत्यांना सांगितले गेले.
Thane Election BJP Vs Shiv Sena: वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल
भाजप कार्यकर्त्यांनी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहराध्यक्ष संदीप लेले यांची भेट घेऊन लेखी निवेदने दिली आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी तर युती झाल्यास निवडणूक काम न करण्याचा इशाराही दिला आहे. यामागचा मुख्य मुद्दा असा आहे की, प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळावी आणि भाजपची ठाण्यातील ता राहावी. याबाबत जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले की, “कार्यकर्त्यांची भावना स्पष्ट आहे – युती नको. मात्र शेवटी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल. नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत घालण्याचा आम्ही प्रयत्न करू,” असे त्यांनी म्हटले आहे.
Thane Election BJP Vs Shiv Sena: वरिष्ठ नेते काय तोडगा काढणार?
दरम्यान, ठाण्यातील राजकीय परिस्थिती सध्या पेचप्रसंगाची आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या भागावर प्रभाव असला, तरी भाजपने गेल्या काही काळात आपली बांधणी मजबूत केली आहे. त्यामुळे जागावाटपात भाजपला कमी जागा मिळाल्यास असंतोष अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या नाराजीनंतर सर्वांचे लक्ष आता भाजपचे वरिष्ठ नेते काय तोडगा काढतात, याकडे लागले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.