मीरा रोडमध्ये भाजप नगरसेवकाने केले महिलेचे लैंगिक शोषण; नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले.
मीरा रोड पूर्वेतील भाजपचा नगरसेवक लक्ष्मण जंगम याने वारंवार लैंगिक शोषण करत अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केल्याने जंगम याच्यावर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मीरा रोडच्या प्रभाग क्रमांक १२ मधील ६० वर्षीय लक्ष्मण जंगम या भाजपच्या नगरसेवकाने एका महिलेला २०२२ पासून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. गोराई बीच येथे या महिलेला फिरायला नेण्याच्या नावाखाली लॉजमध्ये नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. पीडितेच्या घरी जाऊनही अत्याचार केला.
लक्ष्मण जंगम याने सदर महिलेशी प्रेमाचे खोटे नाटक करून मी तुझ्याशी लग्न करेन असे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात लग्न न करता अनेकदा लैंगिक शोषण केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. भाजपच्या नगरसेवकाने पीडितेला तू पोलीस ठाण्यात गेलीस तर बघून घेईन.. अशी धमकीही दिल्याची तिची तक्रार आहे. सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास मीरा रोडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण भोसले हे करीत आहेत.
पीडितेवरही खंडणीचा गुन्हा
भाईंदर महापालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर पीडितेने तीन बीएचके फ्लॅट, एक दुकान व पाव किलो सोने अशी मागणी केली अशी उलट तक्रार नगरसेवक लक्ष्मण जंगम याने केली. यानंतर त्या पीडित महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.