क्रीडानगरीतून – ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉनचे आयोजन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ठाणे – लोक आश्रमच्या वतीने ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने येत्या रविवारी 23 ऑगस्टला ठाणे जिल्हास्तरीय ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकातून सुरू आणि तेथेच शेवट होणाऱया या शर्यतीमध्ये पुरुष-महिला गट (10किमी), 18 वर्षे मुले-मुली (7 किमी), 15 वर्षे मुले-मुली (5 किमी), 12 वर्षे मुले-मुली (3 किमी) अशा अंतराच्या शर्यतींचा समावेश आहे. प्रत्येक शर्यतीतील पहिल्या दहा क्रमांकांच्या विजेत्यांना रोख बक्षिसांनी गौरवण्यात येणार आहे.

आयआयटीची ताकद जगाच्या ट्रॅकवर

मुंबई – वेग, तंत्रज्ञान आणि अचूकतेचा भन्नाट संगम साधत आयआयटी मुंबई रेसिंग टीमने पोर्तुगालमधील पॅस्टेलो ब्रांको येथे झालेल्या फॉर्म्युला स्टुडंट्स (एफएस) स्पर्धेत दणदणीत यश मिळवले. सर्वसाधारण श्रेणीत इलेक्ट्रिक कार आणि ड्रायव्हरलेस कार रेसिंग या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांकाचे पोडियम स्थान पटकावत आयआयटी मुंबईने आंतरराष्ट्रीय रेसिंग ट्रकवर हिंदुस्थानची तांत्रिक ताकद दाखवून दिली. या ऐतिहासिक कामगिरीत राहिलचेही मोलाचे योगदान राहिले. 2025-26 मोसमासाठी त्याने चीफ ऑफ ऑपरेशन्स (सीओओ) आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (सीटीओ) या ड्राइव्हट्रेन अॅण्ड व्हील असेंब्ली अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली. शिक्षण आणि मोटरस्पोर्ट्सची सांगड घालत मिळवलेले यश आयआयटी मुंबईसाठी अभिमानाचे आहे.

Comments are closed.