16 वर्षांनंतर अश्विन-जडेजाविना मैदानात उतरणार टीम इंडिया! नव्या फिरकी जोडीवर मोठी जबाबदारी

भारतीय क्रिकेट संघ 6 जूनपासून घरच्या मैदानावर होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय कसोटी मालिकेने आपल्या दीर्घ आंतरराष्ट्रीय हंगामाची सुरुवात करणार आहे. हा सामना न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या कसोटीत टीम इंडिया शुबमन गिलच्या (Shubman gill’s under captaincy) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असून, संघात काही नवीन खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांत भारतीय फिरकी गोलंदाजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, त्यामुळे टीम इंडिया आपल्या अंतिम 11 खेळाडूंच्या संघात (Playing 11) किती फिरकी गोलंदाजांना स्थान देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, भारतीय संघ खूप वर्षांनंतर घरच्या मैदानावर रविचंद्रन अश्विन (R. Ashwin & Ravindra Jadeja) आणि रवींद्र जडेजा यांच्याशिवाय कसोटी सामना खेळणार आहे. रविचंद्रन अश्विनने 2024 च्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तर रवींद्र जडेजाला कामाचा ताण (Workload Management) पाहता अफगाणिस्तानविरुद्धच्या या कसोटी मालिकेसाठी संघात निवडलेले नाही. अश्विनच्या निवृत्तीनंतर जडेजा घरच्या मैदानावर फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व करत होता. तब्बल 16 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर अश्विन आणि जडेजा या दोघांशिवाय कसोटी सामना खेळणार आहे. याआधी 2010 मध्ये नागपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात हे दोन्ही खेळाडू संघात नव्हते, कारण तेव्हा त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले नव्हते.

अफगाणिस्तानविरुद्धच्या या कसोटी सामन्यात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हा सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज म्हणून संघात आहे आणि त्याचे खेळणे निश्चित मानले जात आहे. याशिवाय, अंतिम 11 मध्ये दुसऱ्या प्रमुख फिरकी गोलंदाजाच्या भूमिकेसाठी पहिल्यांदाच संघात निवड झालेले हर्ष दुबे आणि मानव सुथार यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. तर तिसरा फिरकी पर्याय म्हणून अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर संघात असेल. गेल्या काही वर्षांत भारतीय फिरकी गोलंदाजांना घरच्या मैदानावर अपेक्षित प्रभाव पाडता आलेला नाही, त्यामुळे या नवीन फिरकी गोलंदाजी युनिटची कामगिरी कशी राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comments are closed.