Men’s U18 Hockey Asia Cup 2026 – सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा धुव्वा; आशिष पूर्तीची धडाकेबाज कामगिरीमुळे हिंदुस्थान फायनलमध्ये
हिंदुस्थानच्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील हॉकी संघाने Men’s U18 Asia Cup 2026 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी (5 जून) झालेल्या अटीतटीच्या सेमीफायनल सामन्यात हिंदुस्थानी संघाने अप्रतिम पुनरागमन करत पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला पूर्ती आशिष तानी, ज्याने एकट्याने चार गोल मारत पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आणले. आता शनिवारी (06 जून 2026) याच मैदानावर जेतेपदासाठी हिंदुस्थानचा सामना जपानशी होणार आहे.
सामन्याची सुरुवात प्रचंड वेगवान आणि आक्रमक झाली. 12व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर पूर्ती आशिष तानीने गोल करून हिंदुस्थानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, दुसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानच्या अदीलने 27व्या मिनिटाला गोल करत स्कोअर 1-1 ने बरोबरीवर आणला. हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते आणि सामना रंजक वळणावर होता.
वर्ल्ड कपच्या नावाखाली फॅन्सची तहान विकली, फिफाचे फॅन्सविरोधी बाटलीबंदीचे तुघलकी फर्मान
तिसऱ्या क्वार्टरमध्ये हिंदुस्थानच्या अली शाहरुखने गोल करत आघाडी 2-1 केली, पण पाकिस्तानने जोरदार पलटवार केला. पाकिस्तानच्या मुहम्मद फरहान आणि उजैर अहमद यांनी लागोपाठ गोल करत आपल्या संघाला 3-2 ने पुढे नेले. यानंतर शेवटच्या क्वार्टरमध्ये हिंदुस्थानने सामन्याचे चित्रच पलटवले. आशिष तानीने सलग गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि सामना संपण्यापूर्वी चौथा गोल डागून हिंदुस्थानचा 5-3 असा शानदार विजय निश्चित केला.
Comments are closed.