'चार धाम' यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे.
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तराखंड राज्यातील ‘चार धाम’ यात्रेचा शुभारंभ आज रविवारपासून होत आहे. रविवारी गंगोत्री-यमुनोत्री या तीर्थस्थळाची द्वारे मुक्त करण्यात येणार आहेत. आतापर्यंत या यात्रेसाठी 18.25 लाख भाविकांची नोंदणी करण्यात आली आहे. ऑफलाईन नोंदणीसही प्रारंभ करण्यात आला असून यात्रेकरुंची संख्या 25 लाखांहून अधिक होईल, असे प्रशासनाचे अनुमान आहे. त्यादृष्टीने सज्जता करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थाही पुरेशा प्रमाणात करण्यात आली आहे.
केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात भाविकांना फुले किंवा गंगाजल अर्पण करता येणार नाही. चारही धामांमध्ये केवळ हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन या चार धर्माच्या भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अन्य धर्मियांसाठी केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे प्रवेश नाकारण्यात येणार आहे. अन्य तीर्थस्थळांसाठीही हाच नियम आहे. विशेष पूजा केदारनाथ मंदिरात दुपारच्या वेळेला होणार नाही. यात्रा मार्गावर वाहने सकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत जाऊ शकतील. केदारनाथ येथे पायी यात्रा करु इच्छिणारे भाविक गौरीकुंड येथे प्रकृतीची तपासणी करु शकतील. यावेळी या यात्रा मार्गावर 48 थांबे बनविण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास येथे 1.18 लाख लोक वास्तव्य करु शकतात. साहाय्यता केंद्रांमध्ये कमी दरात चांगल्या सुविधा पुरविल्या जातील, असे प्रतिपादन व्यास्थापनाने केले आहे.
Comments are closed.