गांधी जयंतीला क्रिकेट वर्ल्डकपचा श्रीगणेशा; आगामी वर्ल्ड कपचा कार्यक्रम वर्षभरापूर्वीच जाहीर

महात्मा गांधींच्या जन्मदिनी अहिंसेचा संदेश देणाऱया दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत क्रिकेटच्या महायुद्धाचा प्रारंभ होणार आहे. 2 ऑक्टोबर 2027 रोजी आयसीसी पुरुष वन डे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 50 दिवस रंगणार असून 21 नोव्हेंबरला जोहान्सबर्ग येथे अंतिम सामना खेळविला जाईल. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱया या वर्ल्ड कपमध्ये 14 संघ, 57 सामने आणि 12 शहरे असा विराट थाट असेल.

महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेशी असलेले 21 वर्षांचे नाते लक्षात घेता, त्यांच्या जयंतीच्या दिवशी क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होणे हा योग विशेष ठरणार आहे.

नवा वर्ल्ड कप, नवा फॉरमॅट

या स्पर्धेत एपूण 14 संघ खेळणार असून  कसोटी दर्जा असलेल्या 10 क्रमांकाच्या संघाला थेट स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथमच नवा फॉरमॅट वापरला जाणार आहे. त्यानुसार वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीचा विजेता संघही मुख्य फेरीत ‘क्वालिफायर ए’ म्हणून स्थान मिळवेल. त्यानंतर पात्रता फेरीतील अन्य तीन संघांमध्ये सुपर सीरीज खेळवून अव्वल संघाला ‘क्वालिफायर बा’r म्हणून संधी मिळेल. त्यानंतर सहा-सहा संघांचे दोन गट पाडण्यात आले असून प्रत्येक संघ गटात एकमेकांशी भिडेल. दोन्ही गटांतील अव्वल तीन संघ सुपर 7 साठी पात्र ठरतील आणि दोन्ही गटात चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघात जो अव्वल असेल तो सातवा संघ म्हणून स्थान मिळवेल. मग या सुपर 7 मध्ये प्रत्येक संघ सहा लढती खेळेल. जे चार संघ अव्वल स्थान पटकावतील, ते उपांत्य फेरीत एकमेकांशी भिडतील.

सर्व संघांना कोड

हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गेल्या काही स्पर्धांप्रमाणे या वर्ल्ड कपमध्येही एकाच गटात भिडतील. दोघांमधील हा महामुकाबला रविवारी 10 ऑक्टोबरला जोहान्सबर्ग येथे रंगेल. या स्पर्धेत क्रिकेटप्रेमींना आपापल्या संघानुसार वर्ल्ड कपचा कार्यक्रम आखता यावा म्हणून आयसीसीने हिंदुस्थान (ए 1), ऑस्ट्रेलिया (ए 2), पाकिस्तान (ए 3), इंग्लंड (एबी 4), न्यूझीलंड (बी 1), दक्षिण आफ्रिका (बी 2), श्रीलंका (बी 3) या सात संघांना आधीच कोड दिले आहेत. जर यापैकी पुणी संघ सुपर 7 साठी पात्र ठरला नाही तर त्यांच्या जागी येणाऱया संघाला त्यांचा कोड दिला जाईल.

नामिबियालाही पात्रता फेरी खेळावी लागणार

नामिबिया सहयजमान असला तरी त्यांच्या संघाला कसोटी दर्जा नसल्यामुळे त्यांना पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. जर यात ते अपयशी ठरले तर ते बादही होतील.

विश्व कपची गटवारी

अ गट ः अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थान, पाकिस्तान, झिम्बाब्वे, क्वालिफायर ए

ब गट ः बांगलादेश, इंग्लंड, द. आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, क्वालिफायर बी.

आशियाई क्रीडा स्पर्धा

पदक सारणी

देश su rou च्या ए

चीन १५४ ७१ ६३ २८८ जपान ५९ ७९ ७९ २१७ द.कोरिया 30 30 53 113

उझबेकिस्तान 16 21 19 56

इराण 12 17 13 42

थायलंड 12 11 15 38

बहरीन 11 05 05 21

हिंदुस्थान 10 23 31 64

कझाकिस्तान 09 19 36 64

u. कोरिया ०७ ०८ ०९ २४

मलेशिया 06 05 13 24

Comments are closed.