पुण्यात राष्ट्रवादीकडून आणखी गुन्हेगाराला तिकीट, जामीनावर असलेल्या आरोपीने दाखल केला अर्ज
पुणे : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची झुंबड उडताना दिसली. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवसभर उमेदवारांना बोलावून एबी फॉर्म वाटण्याचे काम सुरु होते. अजित पवार यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गजा मारणे याच्या पत्नीला उमेदवारी दिली. तसेच आयुष कोमकर हत्याप्रकरणातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालेली उमेदवारी चर्चेचा विषय ठरली. तसेच राष्ट्रवादीकडून आणखी एका गुन्हेगाराला उमेदवारी देण्यात आली आहे. कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर याने देखील प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिपक मारटकर हत्या प्रकरणात कुमार प्रभाकर नायर हा जामीनावर आहे.
दीपक मारटकर यांची 2 ऑक्टोबरला मध्यरात्री हत्या झाली होती
दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे पुत्र दीपक मारटकर यांची 2 ऑक्टोबरला मध्यरात्री हत्या झाली होती. रात्री जेवण करुन मारटकर हे घराबाहेर पडले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले होते. त्यांच्या पाठीवर, डोक्यावर आणि छातीवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली होती.
बापू नायर 2015 पासून कारागृहात होता. तो 2021 मध्ये कारागृहातून बाहेर आला. दरम्यान, 2020 मध्ये तेव्हाच्या शिवसेना युना सेनेचा नेता दिपक मारटकर याचा खून झाला होता. स्वप्नील मोढवे या खूनातील मुख्य आरोपी, बापू नायर कारागृहातून चेकपसाठी ससून रुग्णालयात आल्यानंतर मारटकर खूनापुर्वी स्वप्नील मोढवे, बापू नायरला भेटला होता. मारटकर खूनात स्वप्नील याला अटक करून चौकशी केल्यानंतर ससून रुग्णालयातील भेट समोर आली होती. त्यानंतर या गुन्ह्यात बापू नायरला पुणे पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, 2024 मध्ये बापू नायर या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आला आहे.
राष्ट्रवादीकडून गुंडांच्या टोळ्यांमध्ये तिकीट वाटप
गुन्हेगारांना सोडणार नाही, टायरमध्ये घाला, अमुक ठिकाणी घाला, तमुक ठिकाणी घाला अशा जाहीर वल्गना करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये मात्र महापालिका निवडणुकीमध्ये आपली सर्व तत्त्व बाजूला ठेवून चक्क गुंडांच्या टोळ्यांमध्ये तिकीट वाटप केलं आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 23 मधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या दोघीसुद्धा जेलमधून निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे गजा मारणेच्या बायकोला सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही घराण्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा इतिहास असतानाही अजित पवारांनी सढळ हाताने उमेदवारी दिल्याने पुण्यातील गुन्हेगारीमुक्तीची स्वप्ने पाहणाऱ्या ‘पालकमंत्री’ अजित पवारांना आता या उमेदवारी कशा चालतात? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोण आहे बापू नायर?
बापू नायरवर हत्येचा पहिला गुन्हा 2021 मध्ये पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात नोंद झाला होता. किरकोळ वादातून त्याने मित्राचा खून केला होता. तेव्हापासून तो गुन्हेगारीत शिरला होता. त्यानंतर टोळी निर्माण केली होती. बापू नायर ने स्थानिक गुंडांच्या साथीने बिबवेवाडी, कोंढवा, धनकवडी तसेच सहकारनगर या भागात टोळीचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व निर्माण केले. खूनाचे प्रयत्न, मारामारी, भांडणे, खंडणी अशा गुन्ह्यातून तो या भागातील भाई झाला.
बैजु नवघणेचा खून
बिबवेवाडी तसेच आसपासच्या परिसरात बापू नायर तसेच गुंड बैजु नवघणे यांच्यात वर्चस्वावरुन वाद होते. 2011 मधे नवरात्रात निघणाऱ्या देवीच्या मिरवणूकीत बैजु नवघणे व बापू नायर यांच्यात वाद झाल्यानंतर बापू नायर टोळीने बैजु याचा खून केला होता. त्यानंतर बापू नायर टोळीची पुण्यात दहशत आणखी वाढली. या गुन्ह्यात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र पुढे त्या गुन्ह्यात नायरची निर्दोष मुक्तता झाली.
गजानन मारणे व बापू नायर एकत्र
कोथरुड भागात गुन्हेगारी करणारा गँगस्टर गजानन मारणे आणि बापू नायर यांच्यात मैत्री झाली. कोथरूड भागात बापू नायरने गजानन मारणे याच्या साथीने केबल व्यवसाय सुरु केला होता.
दहशतीसाठी तोडफोड
बिबवेवाडी व आसपासच्या परिसरात बापू नायर टोळीकडून सातत्याने दहशतीचे साम्राज्य उभे केले जात होते. रस्त्यावरील वाहने तोडफोड करून दहशत माजविण्यात येत होती. त्यामुळे नागरिक भयभीत होत असत
एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा
बापू नायर याच्यावर 2015 मध्ये खूनाचा प्रयत्न यासह वेगवेगळ्या कमलांनुसार कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यात तो अटक होता. त्याचवेळी सहकारनगर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात न्यायालयाने बापू नायरला एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती.
बापू नायरला मारटकर खून प्रकरणात अटक
बापू नायर 2015 पासून कारागृहात होता. तो 2021 मध्ये कारागृहातून बाहेर आला. दरम्यान, 2020 मध्ये तेव्हाच्या शिवसेना युना सेनेचा नेता दिपक मारटकर याचा खून झाला होता. स्वप्नील मोढवे या खूनातील मुख्य आरोपी, बापू नायर कारागृहातून चेकपसाठी ससून रुग्णालयात आल्यानंतर मारटकर खूनापुर्वी स्वप्नील मोढवे, बापू नायरला भेटला होता. मारटकर खूनात स्वप्नील याला अटक करून चौकशी केल्यानंतर ससून रुग्णालयातील भेट समोर आली होती. त्यानंतर या गुन्ह्यात बापू नायरला पुणे पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, 2024 मध्ये बापू नायर या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
आणखी वाचा
Comments are closed.