भारतात गेंड्यांची संख्या 3,700 पेक्षा जास्त आहे.

गुवाहाटी: भारतात एक शिंग असलेल्या गेंड्यांची संख्या 3,700 हून अधिक झाली आहे. आसाममध्ये 3,260 तर पश्चिम बंगालमध्ये 392 आणि उत्तरप्रदेशच्या दुधवा व्याघ्र प्रकल्पात 53 गेंडे आहेत. संरक्षणामुळे गेंड्यांची संख्या वाढली आहे, परंतु आता त्यांच्यासाठी गवताळ मैदाने आणि नैसर्गिक अधिवास राखणे मोठे आव्हान ठरणार आहे. जगात एकच शिंग असणारे 4,075 गेंडे आहेत. भारत आणि नेपाळ हे त्यांचे प्रमुख अधिवास आहेत.

Comments are closed.