अखेर सत्य समोर आलेच!
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगात कोणताही वाद किंवा संघर्ष नाही, ही सत्यस्थिती अखेर शनिवारी समोर आलीच आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या एकत्रित बैठकीत सर्व आरोपांच्या चिंधड्या उडविल्या असून आयोग प्रत्येक निर्णय एकमुखाने घेत आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे. या पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संबित पात्रा यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया व्यक्त केली. एका वृत्तपत्रातून आयोगावर करण्यात आलेले सर्व आरोप कसे निराधार आणि तथ्यहीन आहेत, हे आयोगाच्या सर्व तीन सदस्यांनी एकमुखाने स्पष्ट केल्याने विरोधकांचे दात त्यांच्याच घशात गेले आहेत. देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न विरोधक करत असून या देशातील सूज्ञ जनता विरोधी पक्षांना क्षमा करणार नाही, अशी टिप्पणीही पात्रा यांनी केली.
Comments are closed.