देशात इबोलाचा एकही रुग्ण नाही!
केंद्र सरकारची माहिती : आफ्रिकन देशांतून आलेले 11 जण विलगीकरणात
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युगांडाहून भारतात आलेल्या एका महिलेची इबोलाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर देशात इबोलाचा एकही रुग्ण नाही, असे केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले. सदर महिला 23 मे रोजी बेंगळूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तिला एका सरकारी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्या महिलेला सौम्य अंगदुखीचा त्रास जाणवत होता, पण आता ती पूर्णपणे तंदुरुस्त आहे. दरम्यान, आफ्रिकन देशांमध्ये इबोला विषाणूच्या प्रसारानंतर युगांडा, दक्षिण सुदान आणि काँगो येथून अहमदाबादमध्ये आलेल्या 11 रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. प्राथमिक तपासात त्यांच्यापैकी कोणीही संशयित आढळले नाही, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे अहमदाबाद महानगरपालिकेचे अधिकारी डॉ. भाविन सोळंकी यांनी सांगितले.
Comments are closed.