प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामागे अशोक चव्हाण असल्याची चर्चा; प्रश्नावरती थेट म्हणाले, ‘अने
हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडत असल्याचे चित्र दिसून येत असून, काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांचा भाजप पक्षात प्रवेश निश्चित झाल्याचं दिसून येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का आहे, हिंगोलीतील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आज प्रज्ञा सातव यांनी विधानभवन सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे आपल्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आहे. आज त्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे, तर प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशामागे अशोक चव्हाण हे असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्याबाबत अशोक चव्हाणांनी एबीपी माझाशी बोलताना सविस्तरपणे भाष्य केलं आहे.
Ashok Chavan: प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशात माझा काही संबंध नाही
अनेक लोकांना काँग्रेसमध्ये आपले भवितव्य सुरक्षित दिसत नाहीये, काँग्रेस पक्षासाठी निष्ठेने काम करणारे वरिष्ठ लोक देखील काँग्रेसमध्ये आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आता नेतृत्वहीन झालेली आहे. लोकांना आपल्या भविष्याची आणि पक्षाचे भविष्याची अजिबात शाश्वती वाटत नाहीये त्यामुळे हे आता होत असावं. प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशात माझा काही संबंध नाही. माझी आणि अनेक दिवसापासून त्यांच्यासोबत काही संवाद नाही. प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती वेगवेगळी आहे. निवडणुकीचे राजकारण वेगळं आहे आणि नॉमिनेशनचा विषय वेगळा आहे, निवडणुकीचा जेव्हा विषय तो तेव्हा मेरिट पहावा लागतो, कोण पॉप्युलर आहे, नेतृत्वाला आपल्या कार्यकर्ता आणि आपल्या नेत्याची जाण असली पाहिजे. काम करणारे बाजूला राहतात आणि काम न करणारे पुढे येतात, त्यामुळे वाद निर्माण होतात. त्यामुळे नेतृत्वाने इकडे लक्ष दिले असते तर काँग्रेसमध्ये हे घडलं नसतं, अशी खंत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक परिस्थितीमध्ये त्यांना सोबत कोणी घ्यायलाच तयार नाहीये, त्यामुळे काँग्रेसकडे पर्याय शिल्लक राहिला नाहीये, असंही त्यांनी पुढे म्हटलंय.
Pradnya Satav: प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा!
विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज (18 डिसेंबर) काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सादर केला असून, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.
Who is Pradnya Satav: कोण आहेत सातव?
डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे 2014 ते 2019 दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचं 2021 मध्ये आजारपणामुळे निधन झालं. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 साली विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती.
राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर स्वत:चे स्थान निर्माण केले होते. ते राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. प्रज्ञा सातव या पहिल्यांदा २०२१ मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या. २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे.
राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे भुषविली होती.
आणखी वाचा
Comments are closed.