‘केईएम’ नामांतराला हजारो नागरिकांचा विरोध! नाव कायम ठेवण्यासाठी सह्यांची मोहीम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोणतेही कारण नसताना ऐतिहासिक वारसा असलेल्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाच्या नामांतरणाविरोधात शिवसेना आणि हजारो नागरिकांनी आवाज उठवला आहे. शिवसेनेच्या वतीने आयोजित नामांतरणाविरोधातील सह्यांच्या मोहिमेत प्रचंड संख्येने सहभागी होत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सह्या करून भाजपच्या राजकारणाला विरोध केला. या सह्यांच्या माध्यमातून केलेल्या विरोधाचे निवेदन आणि सह्या आज शिवसेनेने पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना दिले. आरोग्य समितीने प्राथमिक मंजुरी दिल्याचा नामांतरणाचा निर्णय रद्द करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

‘केईएम’ रुग्णालयाचे नाव बदलून ‘काwशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करण्याचा प्रस्ताव मंत्री मंगलप्रभात लोढा मांडला होता. या प्रस्तावाला पालिकेच्या आरोग्य समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात मुंबईकरांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या विरोधाला वाचा पह्डण्यासाठी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिवडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने सह्यांची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये हजारो नागरिकांनी नामांतरणाला विरोध दर्शवत शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा दिला. या बैठकीप्रसंगी शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.