सोशल मीडियाचा रंग, मारहाण, क्रेटकरचा; इंद्रजित सावंत यांचे अपील, असे सांगत.

Indrajit Sawant Threat Call Case  नागपूर : फोन मोर्फिंग करणं इतकं सोपं नाही, तो फोन मोर्फिंग झाला असता तर त्यांच्याकडूनच झाला असता. स्वतः त्या व्यक्तीने नाव सांगितलं होतं म्हणून मी माझ्या पोस्टमध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहिलं. पोलीस दलाने तपास करून तो नंबर आणि फोन प्रशांत कोरडकर यांनीच केला होता, हे सांगितलं असेल तर पोलिसांनी संभ्रम दूर केला आहे.  किंबहुना प्रशांत कोरटकर (प्रशांत कोराटकर) यांनीच फोन केला होता, हे पोलिसांच्या तपासामुळे आता सिद्ध झालं आहे. मी कधीच कुणाला धमकीचा फोन केला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना काय झालं तर त्याला मी कसा काय जबाबदार असेल?

माझ्या पोस्टमध्ये सुद्धा मी त्यांचा नंबर दिला नाही, किंवा कुणाला फोन करा म्हणून सांगितलं नाही. संबंधित व्यक्ती शिवाजी महाराजांच्या बद्दल छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल काय विचार करतेय, हेच सांगण्याचा माझा प्रयत्न असल्याची स्पष्टोक्ती देत इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत (Indrajeet Sawant) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

परस्त्रीचा देखील सन्मान करा अशी शिवरायांची शिकवण, पण..

प्रशांत कोरटकर यांनी दिलेल्या धमकी प्रकरणात कोरटकर यांच्या कुटुंबीय (पत्नी) नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी पोहोचल्या आहेत. समाजमाध्यमातून त्यांना धमक्या येत असल्याच्या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्या पोलीस स्टेशनमधून प्रसार माध्यमांशी न बोलता निघून गेल्या आहेत. या प्रकरणावर बोलताना  इंद्रजित सावंत म्हणाले की, सगळ्यांना आवाहन आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीचा देखील सन्मान करा अशी शिकवण दिली आहे. पण लोक त्यांना फोन करत असतील तर त्याचा आणि माझा कुठलाही संबंध नाही. त्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या बद्दल देखील शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केलाय. प्रशांत कोरटकर यांच्या घरातील लोकांनी देखील सांगितलं पाहिजे होते की हे चुकीचे बोलले आहेत. त्यामुळे हे प्रकरण वेगळीकडे नेण्याची भूमिका जर कुणाचे असेल तर ते देखील बरोबर नाही, असेही इंद्रजित सावंत म्हणाले.

पोलिसांनी मला सुरक्षा घेण्याबाबत सांगितलं होतं, मात्र..

पोलीस दल इतकं सक्षम असताना चार ते पाच दिवस झाले तरी तो आरोपी कसा काय सापडत नाही? काल साधारण सहा ते सात तास फॉरेन्सिक टीमने माझ्या मोबाईलमधील जे आवश्यक पुरावे पाहिजे आहेत ते घेतले आहेत. मला कारवाईबाबत कुठल्याही अपडेट पोलिसांकडून मिळत नाहीत. माध्यमांमधून जे अपडेट मिळतात तितकंच मला माहिती आहे. पोलिसांनी मला सुरक्षा घेण्याबाबत सांगितलं होतं, मात्र मी ते नाकारली असल्याची माहिती ही इंद्रजित सावंत यांनी दिली.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.