दक्षिण विभागावर फॉलोऑनचे संकट; मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार यांचा कहर, कर्णधार तिलक वर्मा संघासाठी शेवटची आशा
पूर्व विभागाच्या 708 धावांना प्रत्युत्तर देताना दक्षिण विभाग अडचणीत सापडला आहे. कर्णधार तिलक वर्मा दक्षिण विभागासाठी शेवटची आशा आहे. तिसऱ्या दिवशी तिलक अर्धशतक झळकावत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिला. देवदत्त पडिक्कलनेही अर्धशतक झळकावले खरे, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार यांनी ठराविक अंतराने विकेट्स मिळवत दक्षिण विभागाचे पंबरडे मोडले. तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण विभागाची 6 बाद 241 अशी अवस्था असून त्यांच्यावर फॉलोऑनचे संकट कोसळले आहे. त्यामुळे सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण विभाग फॉलोऑन टाळतो की, अडकतो यावर सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.
दक्षिण विभागाची वाईट सुरुवात
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पूर्व विभागाचा संघ 708 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात दक्षिण विभाग तिसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरला. दक्षिण विभागासाठी रिकी भुई आणि एन. जगदीसन यांनी डावाची सुरुवात केली. पण संघाची सुरुवात वाईट झाली आणि त्यांनी 10 धावांवर पहिली विकेट गमावली. .
अडचणीत येण्यासाठी अर्धशतक झळकावले , पण…
श्रीलंका दौऱ्यात हिंदुस्थानसाठी दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन शतके झळकावणाऱ्या देवदत्त पडिक्कलने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही आपला फॉर्म कायम ठेवला. 10 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर पडिक्कलने जगदीसनसोबत मिळून डावाची सूत्रे हाती घेतली. जगदीसनने चांगली सुरुवात केली, पण त्याचे मोठय़ा धावसंख्येत रूपांतर करू शकला नाही आणि 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर शकील रशीद फलंदाजीला आला आणि त्याने देवदत्तला उत्पृष्ट साथ दिली.
पडिक्कलने अर्धशतक झळकावले, पण तो 62 धावांवर बाद झाला. त्यामुळे तो मोठी खेळी साकारेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही आणि त्याचा मोठा फटका संघाला बसला. त्यानंतर रशीदलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि तो 27 धावांवर बाद झाला.
शमी आणि मुकेश यांचा अचूक दाबा
मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार यांच्या अचूक माऱ्यापुढे दक्षिण विभाग हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. कुमारने सलामीवीर रिकी भुईला बाद केले. पण त्यानंतर त्याने देवदत्त पडिक्कलला बाद करत दक्षिण विभागाच्या धावांवर अंपुश आणला. त्यानंतर मोहम्मद शमीने दोन फलंदाजांना बाद करत दक्षिण विभागाला जेरीस आणले.
टिळक वर्माने डाव सावरला
पडिक्कल बाद झाल्यानंतर तिलकने दक्षिण विभागाचा डाव सावरला. त्याने 123 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. पण तो फलंदाजी करत असताना दुसऱ्या टोकाकडून विकेट्स पडतच राहिल्या. स्मृती रविचंद्रन 23 धावांवर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस गोपालने कर्णधाराला साथ दिली आणि खेळपट्टीवर वेळ घालवण्याचा प्रयत्न केला, पण तोही 26 धावांवर बाद झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण विभागाची धावसंख्या 6 बाद 242 अशी आहे. तिलक 56 धावांवर, तर चामा व्ही. मिलिंद 2 धावांवर नाबाद राहिले आहेत.
Comments are closed.