रोहितने ज्याच्यावर ठेवला विश्वास, तोच लाडका बनला कर्णधार! साई सुदर्शन मात्र बाहेर, संघ जाहीर
दुलेप ट्रॉफी स्पर्धेत कॅप्टन टिलक वर्मा: मुंबई इंडियन्सची शान आणि रोहित शर्माचा आवडता खेळाडू असलेल्या तिलक वर्माला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दिलीप ट्रॉफी 2025-26 मध्ये साउथ झोन संघाचा कर्णधार म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. या वर्षी दिलीप ट्रॉफी पुन्हा जुन्या स्वरूपात खेळवली जाणार असून, त्यामध्ये सहा झोनल संघ सहभागी होतील. शनिवारी पुद्दुचेरीतील सिचेम स्टेडियमवर पार पडलेल्या साउथ झोन सिलेक्टरांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या हंगामात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे तिलक वर्मा रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादकडून खेळू शकला नव्हता. मात्र, त्याच्या फॉर्म आणि नेतृत्वगुणांमुळे त्याच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे. केरळचा तडाखेबाज फलंदाज मोहम्मद अजहरुद्दीन याची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. अजहरुद्दीनने मागील रणजी हंगामात दमदार खेळ करत केरळला पहिल्यांदाच रणजी फायनलमध्ये पोहोचवले होते.
देवदत्त पड्डिकल, साई किशोर यांची निवड, साई सुदर्शन मात्र बाहेर
तिलक वर्मा सध्या प्रचंड फॉर्मात आहे. काउंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायरकडून खेळताना त्याने पदार्पणातच शतक झळकावलं, आणि नंतरच्या चार डावांमध्येही 56, 47 आणि 100 अशा खेळी केल्या आहेत. तमिळनाडूचा यष्टीरक्षक एन. जगदीशन यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. नुकताच तो ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध ओव्हल टेस्टसाठी टीम इंडियातही निवडला गेला आहे. या संघात देवदत्त पड्डिकल, आर साई किशोर यांसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूसुद्धा आपली चमक दाखवणार आहेत. पण, इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग असल्याने, तामिळनाडूचा साई सुदर्शन दुलीप ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाच्या संघात सामील होऊ शकत नाही.
दुलीप ट्रॉफीमध्ये 6 झोनमधील संघ खेळतील
दुलीप ट्रॉफीमध्ये 6 झोनमधील संघ खेळताना दिसतील. यामध्ये नॉर्थ झोन, ईस्ट झोन, नॉर्थ-ईस्ट झोन, साउथ झोन, वेस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांचा समावेश आहे. तिलक वर्मा साउथ झोनचा कर्णधार असतील.
साउथ झोन संघ (दिलीप ट्रॉफी 2025-26 ) : टिळक वर्मा (कर्नाधार्ड) (हैदरबाद), मोहम्मद अझ्रुदिन (उपडधर) (अपदाहर), तन्माय अग्रवाल (केशर), तन्माया कृषी (करंटका), मोहित काळे (पेडधुरा), मोहिता (पगदुन) (पेडडन), मोहिता (केवाडाई). .
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.