तिलक वर्माकडे हिंदुस्थानच्या ‘अ’ संघाचे कर्णधारपद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

श्रीलंकेत होणाऱ्या आगामी एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी हिंदुस्थानच्या ‘अ’ संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. तिलक वर्माची या दौऱ्यासाठी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर धडाकेबाज सलामीवीर वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान दिले आहे. आयपीएमध्ये पंजाब किंग्जच्या संघातील मुंबईकर सूर्यांश शेडगेची या संघात करण्यात आली आहे.

हिंदुस्थानचे सामने कोणाशी होणार…
स्टार फलंदाज तिलक वर्माची या संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर संघाचे उपकर्णधारपद हे रायन परागकडे सोपवण्यात आले आहे. या मालिकेत हिंदुस्थानचा सामना यजमान श्रीलंका ‘अ’ आणि अफगाणिस्तान ‘अ’ संघांशी होईल.

वैभव सूर्यवंशीसाठी सुवर्णसंधी…
वैभव सूर्यवंशीसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे म्हटले जात आहे, जेणेकरून त्याचा हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. वैभव आतापर्यंत हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील संघात खेळला आहे. पण भारताच्या ‘अ’ संघात स्थान मिळवणे म्हणजे त्याच्यासाठी दमदार संधी आहे. या आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना वैभवने आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली होती. इतक्या लहान वयात हिंदुस्थानच्या ‘अ’ संघात स्थान मिळवणे हा त्याच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

तिरंगी मालिकेसाठी हिंदुस्थान ‘अ’ चा संपूर्ण संघ
तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रायान पराग (उपकर्णधार), आयुष बदोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक), कुमार कुशाग्रा (यष्टिरक्षक), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज आणि अर्शद खान.

Comments are closed.