IPL 2026 – चेन्नईचा गेम करण्यासाठी लखनौ सज्ज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चेन्नई सुपर किंग्जचा संघ हा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची वाट पाहत आहे, तर दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सचा स्पर्धेतील गाशा गुंडाळला आहे. चेन्नईला यावेळी जर पराभव स्वीकारावा लागला तर त्यांच्यासाठी मोठा धक्का असेल. त्यामुळे चेन्नईचा गेम करण्यासाठी लखनौचा संघ सज्ज असेल.
चेन्नई प्ले ऑफमध्ये कशी पोहोचू शकते…
चेन्नईच्या संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी सहा लढती जिंकल्या असून त्यांना पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. आता चेन्नईचे तीन सामने बाकी आहेत. जर त्यांनी हे तिन्ही सामने जिंकले तर सहजपणे ते प्ले ऑफ गाठू शकतात.
चेन्नईच्या संघाला बसला मोठा धक्का…
या सामन्यापूर्वी चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण जेमी ओव्हर्टनसारखा दमदार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. चेन्नईच्या संघात फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगला समन्वय
दिसत आहे. सलामीवीर संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड आपली भूमिका चोख बजावत आहेत. उर्विल पटेलने गेल्या सामन्यात तुफानी फटकेबाजी केली होती. त्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. अंशुल कंबोज आणि नूर अहमद सातत्याने भेदक मारा करत आहेत.
लखनौला वचपा काढण्याची संधी…
लखनौचा संघ हा नावापुरताच सुपर जायंट्स ठरला आहे. कारण या हंगामातील त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. पण जाता जाता ते अन्य संघांचा गेम करू शकतात. लखनौचा संघ या सामन्यात गेल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेऊ शकतो. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात सातत्य न राखल्यामुळेच लखनौचा संघ स्पर्धेच्या बाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments are closed.