भारत इंग्लंड टी20 सामन्याची वेळ बदलणार; जाणून घ्या सविस्तर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरू होणार आहे. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरसाठी सुरुवात अत्यंत खराब झाली आहे; आयर्लंडविरुद्धचे दोन टी20 आंतरराष्ट्रीय सामने गमावल्यानंतर संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान, भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. 1 जुलैपासून पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सामने किती वाजता सुरू होणार आणि कुठे लाईव्ह पाहता येणार, जाणून घेऊया.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2026 चं जेतेपद पटकावलं. पण खराब फॉर्ममुळे सूर्यकुमारच्या जागी आता भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर देण्यात आली आहे. श्रेयस अय्यर गेल्या बऱ्याच काळात भारताच्या टी20 संघाचा भाग नव्हता, पण आता तो थेट भारताच्या टी20 संघाचं नेतृत्तव करत आहे. त्याच्या नेतृत्त्वातील पहिल्याच मालिकेत संघाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. यानंतर इंग्लंड मालिकेत संघ कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा असतील.
इंग्लंडमध्ये टी20 मालिका होणार असल्याने सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा खेळवण्यात येणार आहेत. भारत-इंग्लंड टी20 सामने पाहण्यासाठी चाहत्यांनी रात्री उशिरापर्यंत जागं राहावं लागणार आहे. मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच 1 जुलैला रात्री 10 वाजता खेळवला जाईल. तर दुसरा सामना भारतीय वेळेनुसार 7 वाजता होईल. उर्वरित तिन्ही सामने रात्री 10 वाजताच होतील. भारत-इंग्लंड मालिकेतील सामने सोनी स्पोर्ट्स टीव्ही चॅनेलवर लाईव्ह पाहता येतील. तर मोबाईलवर जिओ हॉटस्टार अॅपवर सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण पाहता येईल.
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, हर्षित राणा, इशान किशन, अक्षर पटेल, प्रसीध कृष्णा, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, सूर्यांश शेडगे, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर.
Comments are closed.