टोमॅटोचे दर 85 रुपयांवर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारचा प्लॅन, कमी दरात मिळणार टोमॅटो
टोमॅटो किंमत: टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या दिल्लीतील जनतेसाठी सरकारकडून दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) द्वारे दिल्लीत सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केली आहे. आता राजधानीतील लोक स्वस्त दरात टोमॅटो खरेदी करू शकतील. ग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने सरकारचे हे पाऊल उचलण्यात आले आहे. दिल्लीतील लोक आता 47 ते 60 रुपये प्रति किलो या दराने टोमॅटो खरेदी करु शकतील. दरम्यान, एका बाजुला टोमॅटोचे दर वाढत असताना दुसऱ्या बाजूला ते दर कमी करण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु आहे. यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील सर्वात मोठ्या भाजीपाला बाजारातून टोमॅटोची खरेदी
एनसीसीएफने 4 ऑगस्टपासून दिल्लीतील सर्वात मोठ्या भाजीपाला बाजारातून, आझादपूर मंडीतून टोमॅटोची खरेदी सुरू केली. त्यानंतर, हे टोमॅटो ग्राहकांना अगदी नाममात्र नफ्यात विकले जात आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या मते, या योजनेअंतर्गत आतापर्यंत 27307 किलो टोमॅटो विकले गेले आहेत.
दिल्लीत टोमॅटोचे दर का वाढले?
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात उत्तर भारतात आणि विशेषतः वायव्य राज्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोचा पुरवठा विस्कळीत झाला. यामुळे दिल्लीत टोमॅटोचे दर अचानक वाढले आणि सरासरी किरकोळ किंमत 73 रुपये प्रति किलोवर पोहोचली. काही दिवसांपासून हा दर 85 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. गेल्या आठवड्यापासून बाजारात टोमॅटोची उपलब्धता पुन्हा वाढू लागली आहे, ज्यामुळे किमती थोड्या कमी होऊ लागल्या आहेत.
देशातील इतर शहरांमध्ये परिस्थिती काय?
दिल्लीत टोमॅटो महाग झाले असतील, परंतु चेन्नई आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये अजूनही किमती नियंत्रणात आहेत. चेन्नईमध्ये टोमॅटोचा सरासरी किरकोळ दर 50 रुपये प्रति किलो आहे तर मुंबईत तो 58 रुपये प्रति किलो आहे. या शहरांमधील हवामान सामान्य राहिले आहे, त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला नाही आणि किमतींमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ दिसून आली नाही.
भाज्यांची अखिल भारतीय सरासरी आणि सध्याची स्थिती
देशभरात टोमॅटोचा सरासरी किरकोळ दर सध्या 52 रुपये प्रति किलो आहे, जो गेल्या वर्षीच्या 54 रुपये आणि 2023 मध्ये 136 रुपये प्रति किलोच्या दरापेक्षा खूपच कमी आहे. सरकारचे म्हणणे आहे की या पावसाळ्यात बटाटा, कांदा आणि टोमॅटो यासारख्या आवश्यक भाज्यांचे दर पूर्वीच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात स्थिर राहिले आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
टोमॅटो उत्पादकांचे अडीच कोटी रुपये थकवले, नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, कांद्याचे लिलाव पाडले बंद
आणखी वाचा
Comments are closed.