राजन पाटलांचा मुलगा बेभान होऊन अजित पवारांना नको ते बोलला, अमोल मिटकरींनी जशास तसं प्रत्युत्तर


राजन पाटील आणि अमोल मिटकरी सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे (Ujjwala Thite) यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानंतर राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी जोरदार आनंद साजरा केला होता. यावेळी बाळराजे पाटील (Balraje Patil) यांनी अजित पवार यांना उद्देशून एक वक्तव्य केले होते. ‘अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही’, असे वाक्य बाळराजे पाटील यांनी बोट दाखवत उच्चारले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊ, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला. (Angar Nagarpanchayat election)

सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगपंचायतीची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या राजन पाटील यांची गेल्या अनेक वर्षांपासून अनगरमध्ये अनभिषिक्त सत्ता आहे. मात्र, यंदा अजित पवारांनी अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उज्ज्वला थिटे यांना रिंगणात उतरवून राजन पाटील यांच्या सूनेसमोर आव्हान उभे केले होते. अनगर नगरपंचायतीमधील राजन पाटील यांच्या पॅनेलच्या 17 जागा समोर कोणीही उमेदवारच उभा नसल्याने बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांनी शड्डू ठोकल्याने राजन पाटील यांची काहीशी कोंडी झाली होती. मात्र, मंगळवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीत उज्ज्वला थिटे यांचा उमेदवार अर्ज नाट्यमयरित्या बाद ठरवण्यात आला. त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून कोणाचीही सही नव्हती. हे तांत्रिक कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला होता. यानंतर राजन पाटील यांच्या समर्थकांनी अनगर नगपंचायतीच्यााबाहेर एकच जल्लोष केला होता.

अनगर नगरपंचायतीच्याबाहेर राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत निवडणुकीत विजय मिळाल्याप्रमाणेच जोरदार जल्लोष केला. यामध्ये राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील  आघाडीवर होते.  त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे पाहत अजित पवार यांना थेट आव्हान दिले. ‘अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही’, असे म्हटले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सध्या सोलापूर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Amol Mitkari: अमोल मिटकरी काय म्हणाले?

राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी यांना सत्तेचा अतिमाज आला आहे. ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच. पण तूर्तास या औलादींच्या मस्तीच्या वागण्याने “मालकाला” भिकारी बनवेल.. तुर्तास इतकेच


आणखी वाचा

उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, ‘अजित पवारss’

आणखी वाचा

Comments are closed.