‘ते’ एक प्रतीक म्हणून औरंगजेबाच्या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल; रोहित पवारांची स्पष्ट भूमिका,
अहिलीनगर: औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण चांगलच तापलंय .मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या संघटनांकडून औरंगजेबाची कबर उखडून टाका असे मागणी वारंवार केली जात आहे .दरम्यान,विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर पाडा अन्यथा बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करू असा इशाराच दिल्याने आक्रमक वातावरण आहे .या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या औरंगजेब कबर(Aurangzeb Tomb) परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ही वाढवण्यात आलाय .यावरून आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलीये .27 वर्षे औरंगजेबाला इथे राहून राज्यकर्ता आले नाही याचा प्रतीक म्हणजे ही औरंगजेबाची कबर आहे .हिकबर आज काढून टाकली तर भविष्यात लोक गडबड करतील .त्यामुळे एक प्रतीक म्हणून या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल .असे रोहित पवार म्हणाले आहेत . (Rohit Pawar)
काय म्हणाले रोहित पवार ?
औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण चांगलंच तापले आहे . अनेकांनी ही कबर उखडून टाकण्याची मागणी केली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी औरंगजेबाची कबर आज काढून टाकली तर भविष्यात लोक गडबड करतील .27 वर्षे औरंगजेबाला येथे राहून राज्य करता आले नाही त्याचे प्रतीक म्हणजे औरंगजेबाची कबर आहे .त्यामुळे एक प्रतीक म्हणून त्या कबरीला हात न लावण्याचे योग्य ठरेल असे रोहित पवार म्हणाले .
छावा चित्रपटात क्रूर राज्यकर्ता म्हणून दाखवण्यात आल्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणत गवगवा केला . त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही झाली . दरम्यान औरंगजेबाची कबर काढून टाकावी या मागणीचा जोर वाढला आहे .
औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले
दरम्यान आज विश्व हिंदू परिषदेने ही अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत राज्यभर 17 तारखेला जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना याबाबत निवेदन जाणार असल्याची माहिती दिली .औरंगजेबाची कबर काढून टाकले नाही तर लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन कार सेवा करतील असा इशारा बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिला . औरंगजेबाची कबर पाडा ही मागणी वारंवार केली जाऊ लागल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेब कबर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे .एस आर पी एफ ची एक तुकडी तसेच दोन अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहेत . कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला चेक करून सोडले जात आहे .
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.