राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्येही भाजपने (BJP) नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच विजयी सुरुवात केली आहे. मतदानाच्या आधीच भाजपने विजयाचा चौकार ठोकला असून राज्यातील तीन महापालिकांमध्ये मिळून भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांसाठी (Mahapalika election) मतदान होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने आपलं विजयाचं खातं उघडलं आहे. भाजप उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्याची आहेत. रेखा चौधरी या दुसऱ्यादा निवडून आल्या आहेत, तर आसावरी नवरे यांची ही पहिलीच टर्म असल्याची माहिती आहे. दुसरीकडे पनवेल महापालिका आणि विदर्भातील धुळे (dhule) महापालिकेतही भाजपच्या प्रत्येकी एक-एक उमेदवार विजयी झाले आहेत.

राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडल्या. काहींनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली, तर काहींनी मतदानाआधीच विजय मिळवला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने 2, पनवेलमध्ये 1 आणि आता धुळे मनपात एक उमेदवार विजयी झाला आहे. पनवेल महानगरपालिकेत नितीन पाटील यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक- 18 ( ब) मधून हि निवड झाली आहे.

राष्ट्रवादीतून भाजपात, एकाच दिवसांत नगरसेवक

धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजीत राजे भोसले यांनी काल तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यांच्या धर्मपत्नी उज्वला भोसले यांना भाजपाचे तिकीट मिळवले होते. मात्र, आज अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे, धुळे मनपातील ‘त्या’ पहिल्याच नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात भाजप प्रवेश केला अन् दुसऱ्याच दिवशी नगरसेवक बनल्याचा वेगळाच रेकॉर्ड त्यांच्या नावावर तयार झाला आहे.

कल्याण डोंबिवलीतील प्रभाग 18 ‘अ’ मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकाही विरोधकाकडून त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने रेखा चौधरींचा विजय निश्चित झाला. तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी नवरे यांनीही विजय मिळवला आहे. आसावरी केदार नवरे यांनी प्रभाग क्रमांक 26 (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.

हेही वाचा

मी भाजपसाठी रात्रंदिवस झटलो; भागवत कराडांनी त्यांच्या जातीच्या माणसाला अन् सावेंनी पीएला तिकीट दिलं; कार्यकर्ता धाय मोकलून रडला

आणखी वाचा

Comments are closed.