माझ्याही वडिलांचा खून झाला होता, ती आग वर्णन करु शकत नाही; ओमराजेंनी दिल्लीहून थेट गाठलं मस्सा

ओमराज निंबाळकर: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. या घटनेनंतर आज धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांचा झालेल्या खुनाचा किस्सा देखील माध्यमांसमोर सांगितला.

अशा प्रसंगातून मी देखील गेलो आहे 2006 साली माझ्या वडिलांचा खून झाला होता. पोटात आग काय असते? याचे मी शब्दात वर्णन करु शकत नाही असे ओमराजे म्हणाले. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. इतका नीचपणाचा कळस कधी पाहिला नाही. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभत नसल्याचे ओमराजे निंबाळकर म्हणाले. नियतीचा खेळ आहे अशा घटनांमधील कुटुंबाचा तळतळाट त्या गुन्हेगारांना परमेश्वर सोडत नाही, त्यांना निश्चित भोगावे लागणार आहे असेही ओमराजे म्हणाले.

गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे

यातील गुन्हेगार कितीही जरी मोठा असला तरी शासन नावाच्या यंत्रणेने त्याला शोधून काढून कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे असे निंबाळकर म्हणाले. माझ्या वडिलांचा देखील 2006 साली खून झाला होता. अद्यापही ते प्रकरण कोर्टात सुरू आहे. या पद्धतीने न्याय मिळणे कठीण असल्याचे ओमराजे निंबाळकर म्हणाले.

वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचा आरोप

मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत. यावरुन आता हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतात. यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता. आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत आहे, तर केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे. जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो.

महत्वाच्या बातम्या:

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांचं अख्ख कुटुंब भावूक, शरद पवारही स्तब्ध; गावकऱ्यांचाही आक्रोश, मस्साजोग गावात नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..

Comments are closed.