नेरूळच्या महिलेनं भाजी विकून पै अन् पै जोडली, पोटाला चिमटा काढून टोरेसमध्ये गुंतवली अन् फसली

टोरेस ज्वेलर्स घोटाळा: मुंबई (Mumbai News) आणि नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai News) एका कंपनीनं हजारो रुपयांच्या परताव्यांचं अमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. टोरस नावाच्या या कंपनीनं आपल्या मुख्य आऊटलेटसह इतर सर्व शाखांना टाळं लावलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाल्याचं समोर आलं आहे. हिऱ्यामध्ये गुंतवणूक करुन महिन्याला 44 टक्क्यांपर्यंत रिटर्न्सच्या आमिषाला हे सगळे गुंतवणूकदार बळी पडले आहेत. काहींनी घरं-दारं विकली, तर कहींनी राहात्या घरावर कर्ज काढलं, कुणी आयुष्याची जमापुंजी देऊन टाकली, तर कुणी पै अन् पै जमा करुन गुंतवणूक केली.

टोरेस कंपनीच्या माध्यमातून Moissanite डायमंड (लॅबमध्ये बनवण्यात आलेले) देऊन लाखो लोकांना कोटी-अब्जावधी रूपयांचा चुना लावला. गोरगरीब गुंतवणूकदारांनी आपल्या कष्टाचे पैसे दिले होते. महिन्याला 44 टक्क्यांपर्यंत रिटर्न्सच्या आमिषाला बळी पडलेल्या गुंतवणूकदारांना ना हप्ते मिळाले. ना दिलेला डायमंड असली निघाला. अनेकांचा विश्वास संपादन करुन टोरेस कंपनीनं गंडा घालून पळ काढला. अनेकजण रस्त्यावर आले आहेत. काय करावं? कुणाला सांगावं? काही सुचत नव्हतं.

भाबडीला आशा होती आणि खूप फसवले गेले

नेरूळ इथे भाजीव्यावसाय करणाऱ्या आरती मोहिते यांनी टोरेस कंपणीमध्ये 10 हाजार गुंतवले होते. टोरेस कंपनी दिलेल्या पैशाला आठवड्याला 11 टक्के रिटर्न्स आणि सोबत डायमंड देत असल्यानं याचा घर खर्चाला चांगला फायदा होईल, या भाबड्या आशेपोटी आरती मोहिते यांनी 10 हजार रुपये गुंतवले. पोटाला चिमटा काढून, 10 टक्के व्याजाने पैसे घेत टोरेस कंपनीमध्ये दिले. यावेळी कंपनीनं त्यांना डायमंड देत पुढील दोन वर्षांत याची किंमत लाखोच्या घरात असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आरती यांना दिलेला डायमंडचा तुकडा तर बनावट निघालाच, दुसरीकडे दिलेल्या पैशाचा एकही हाप्ता मिळाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये नोंदणीकृत ‘प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीनं 2024 मध्ये ‘टोरेस’ ब्रँड अंतर्गत दादरमध्ये 30 हजार स्क्वेअर फुटांचे आउटलेट उघडले. यानंतर कंपनीने मीरा-भाईंदरसह इतर ठिकाणी आऊटलेट्स उघडले. त्यानंतर कंपनीनं सोनं, चांदी आणि Moissanite (लॅबनं तयार केलेले हिरे) खरेदीवर त्याच रकमेवर अनुक्रमे 48, 96 आणि 520 टक्क्यांचा ​​वार्षिक परतावा देण्याचं वचन दिलं. त्यानंतर गुंतवणूकदारांना दर आठवड्याला परतावा दिला जात होता. दोन आठवडे परताना न मिळाल्यानं गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेतली आणि टोरेसचा 2025 मधला सर्वात मोठा स्कॅम उघडकीस आला.

पाहा व्हिडीओ : Torres Company Fraud: 44 टक्क्यांचा परतावा देतो सांगत गंडवलं, सर्व कार्यालयं बंद करीत कंपनी पसार

अधिक पाहा..

Comments are closed.