टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, आयपीओ लिस्ट होताच शेअरला सतत अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल
मुंबई : भारतीय शेअर बाजारात 2024 मध्ये गुंतवणूकदारांनी मेनबोर्ड आयपीओ आणि एसएमई आयपीओला दमदार परतावा दिला. टॉस द कॉइन कंपनीनं एसएमई आयपीओ आणला होता. या कंपनीचा आयपीओ 17 डिसेंबरला लिस्ट झाला होता. कंपनीनं या आयपीओचा किंमतपट्टा 182 रुपये निश्चित केला होता. हा आयपीओ 90 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. लिस्ट होताच शेअर 363 रुपयांवर पोहोचलेला म्हणजेच पहिल्या दिवशी 99 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला होता.
शेअर बाजारात टॉस द कॉइन कंपनीच्या आयपीओची जोरदार चर्चा आहे. हा आयपीओ लिस्ट झाल्यापासून सलगपणे अप्पर सर्किट लागत आहे.17 डिसेंबरला आयपीओ लिस्ट झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये आता 100 रुपयांची वाढ झाली असून काल बाजार बंद झाला तेव्हा शेअर 463 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या सात दिवसात 100 रुपयांची वाढ झाली आहे.
504,000 शेअर जारी
Toss The Coin नं IPO आयपीओद्वारे 504000 शेअर जारी केले होते. या आयपीओचा किंमतपट्टा 172-182 रुपयांदरम्यान होता. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 600 शेअर होते. कंपनीनं 9 डिसेंबरला अँकर गुंतवणूकदारांकडून 2.60 कोटी रुपये जमवले होते. टॉस द कॉइन ही कंपनी चेन्नईतील मार्केटिंग कन्सल्टिंग कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 2020 मध्ये झाली होती. ही कंपनी मार्केटिंग सेवा पुरवते. ही कंपनी बी2बी टेक कंपन्यांसाठी ब्रँडिंग, कंटेंट डेव्हलपमेंट, वेबसाइट डिजाइन, सोशल मिडिया कॅम्पेन आणि गो टू मार्केट रणनीती तयार करते.
शेअर बाजारात पाच मेनबोर्ड आयपीओ वेटिंगवर
भारतीय शेअर बाजारात 27 डिसेंबरला मेनबोर्ड आयपीओ लिस्ट होणार आहेत.ट्रान्सरेल लायटिंग, ममता मशिनरी, डीएएम कॅपिटल अॅडव्हायजर, सनातन टेक्स्टाइल, कॉनकॉर्ड एनवायरो सिस्टीम्सचे आयपीओ 27 डिसेंबरला लिस्ट होतील. या आयपीओवर गुंतवणूकदारांनी पैशांचा पाऊस पाडला आहे. हे सर्व आयपीओ खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बोली लावली आहे. जीएमपीनुसार या आयपीओसाठी बोली लावणाऱ्यांना गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. ममता मशिनरी, ट्रान्सरेल लायटिंग आणि डीएएम कॅपिटलचे आयपीओ जीएमपीनुसार लिस्ट झाल्यास गुंतवणूकदारांना चांगले पैसे मिळतील.
इतर बातम्या :
IPO Allotment : शेअर बाजारात पाच आयपीओ लिस्टींगसाठी वेटिंगवर, IPO अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार?
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..
Comments are closed.