Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली असून भाजपनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांचं नाव विधानपरिषदेचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत होतं. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्यांनाच आग्रह केला जात होता. मात्र, अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिल्याने आता सस्पेन्स संपला आहे. राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने 6 उमेदवार जाहीर केल्यानंतर आता ठाकरे गटानेही सस्पेन्स संपवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जागी आता अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनीच विधानपरिषदेवर जावं अशी महाविकास आघाडीतील नेत्यांची इच्छा होती. त्यात, ठाकरे गटातील नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्याच नावाचा आग्रह धरला होता. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी आपलं वजन अंबादास दानवे यांच्या पारड्यात टाकल्यामुळे, आता ते ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार असतील. अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील, उद्या सकाळी 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अंदाबास दानवे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळं संपल्याने त्यांच्या जागी कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.
Comments are closed.