कारवाईच्या भीतीनं ‘शटर’ डाऊन तर काही ठिकाणी विक्रीच बंद; तुकाराम मुंढेंचा धसका! दुकानातून सुटे
अहिल्यानगर : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी (Tukaram Mundhe) पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध आणि औषधांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. राज्यभर सुरू असलेल्या या मोहिमेचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात किराणा दुकानांमधून सुट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून, “आतापर्यंत आपण नेमकं काय खात होतो?” असा सवाल अनेकजण उपस्थित करत आहेत.(Tukaram Mundhe)
Tukaram Mundhe : गेल्या महिनाभरात परिस्थितीत अचानक बदल
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील किराणा दुकानांत ग्राहकांना गरजेनुसार अर्धा लिटर, एक लिटर किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात सुटे खाद्यतेल विकले जात होते. मात्र गेल्या महिनाभरात परिस्थितीत अचानक बदल झाला आहे. आता बहुतांश दुकानदार ग्राहकांना थेट कंपनी पॅक असलेल्या एक, पाच किंवा दहा लिटरच्या खाद्यतेलाच्या पिशव्या अथवा डबेच देत आहेत. सुट्या तेलाची विक्री जवळपास बंद झाल्याने यामागे भेसळविरोधी कारवाईची धास्ती असल्याची चर्चा सुरू झाली आहे.(Tukaram Mundhe)
Tukaram Mundhe : तेलाच्या चवीत आणि गुणवत्तेत बदल
याच पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. तेलाच्या चवीत आणि गुणवत्तेत बदल जाणवत असल्याचे काही ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पूर्वी विकले जाणारे सुटे तेल नेमके कोणत्या प्रकारचे होते, त्यामध्ये भेसळ तर नव्हती ना, अशी शंका ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, भेसळयुक्त खाद्यतेलामध्ये पामतेल, ऑर्गेमोन तेल, खनिज तेल, वापरलेले तेल तसेच कृत्रिम सुगंधी द्रव्यांचा वापर केला जातो. अशा तेलाचे सेवन दीर्घकाळ केल्यास हृदयविकार, रक्तदाबातील समस्या, रक्ताची घनता वाढणे, त्वचारोग, अपचन तसेच हार्ट अटॅकसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः हॉटेल्स, फास्ट फूड सेंटर, लग्नसमारंभ आणि मोठ्या भोजन कार्यक्रमांमध्ये अशा तेलाचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याचे यापूर्वीच्या तपासांमध्ये समोर आले आहे.
Tukaram Mundhe : मनोज जरांगे पाटील यांनी मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत सरकारला दिला इशारा
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या कारवाईला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत सरकारला इशारा दिला आहे. “तुकाराम मुंढे सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले काम करत आहेत. सरकारने त्यांच्या बदलीचा विचार करू नये. तसे झाल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील,” असे जरांगे यांनी म्हटले आहे. राज्यात सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेमुळे ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आता अधिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Oil : भेसळीच्या तेलाचे परिणाम काय होतो?
हृदय विकार, रक्ताची घनता वाढ, हार्ट अटॅकने मृत्यू, त्वचा विकार, अपचन.
Oil : जास्त वापर कुठे होत होता ?
हॉटेल्स, लग्न किंवा समारंभातील जेवण, फास्ट फूड इत्यादी.
Oil : तेलामध्ये कशाची भेसळ करतात ?
ऑर्गेमाइड तेल, पामतेल, खनिज तेल, वापरलेले तेल, अन्य स्वस्त पदार्थ, कृत्रिम वास असलेली द्रव्य वापरतात.
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Comments are closed.