अर्ज अवैध ठरवताना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘मिरगी’ आली होती का? बाजोरिया पिता-पुत्रांनी पु

अमरावती विधान परिषद निवडणूक 2026: विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या (Amravati Vidhan Parishad Election 2026) निवडणुकीत आता एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजोरिया (Viplav Bajoria) यांचा अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज (Nomination Paper) निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला होता. या रद्द केलेल्या अर्जावरून आता माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि विप्लव बाजोरिया या पिता-पुत्रांनी निवडणूक प्रक्रियेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, काही खळबळजनक पुरावे समोर आणले आहेत.

अमरावतीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हे ‘मॅनेज’ असल्याचा घणाघाती आरोप बाजोरिया पिता-पुत्रांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केला आहे. इतकेच नव्हे तर, अमरावतीची संपूर्ण निवडणूकच मॅनेज झाली असून विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद करण्यासाठी काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) हे दोन्ही विरोधी पक्ष एकत्र आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Amravati Vidhan Parishad Election 2026: काय आहेत बाजोरिया पिता-पुत्रांचे दावे आणि पुरावे?

विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज ज्या त्रुटी दाखवून बाद करण्यात आला, अगदी तशाच पद्धतीने भरलेले इतर 17 मतदारसंघांतील उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत, असा दावा बाजोरिया यांनी केला आहे. त्यांनी अमरावती, वर्धा, जळगाव, ठाणे, परभणी आणि हिंगोली यांसह इतर मतदारसंघांतील तब्बल 17 ते 20 उमेदवारांच्या अर्जांचे नमुने पुरावे म्हणून गोळा केले आहेत.

– अमरावती, वर्धा, जळगाव, ठाणे, परभणी-हिंगोली यांसह इतर काही महत्त्वाच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज.

– यातील बिनविरोध निवडून आलेल्या यवतमाळ, वर्धा आणि ठाणे मतदारसंघातील अनुक्रमे दुष्यंत चतुर्वेदी, अरुण लखानी आणि रवींद्र फाटक यांचे उमेदवारी अर्ज आपल्याच उमेदवारी अर्ज प्रमाणे भरल्याचा बाजोरियांचा दावा.

– यासोबतच हिंगोली, जळगाव येथील काही महत्त्वाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज.

– यातील काही महत्त्वाच्या उमेदवारांनी माहितीचे अनेक रकाने रिकामे ठेवल्याचं आणून दिलं निदर्शनास.

– आपल्या अर्जात माहितीचा कोणताही रकाना रिकामा नसल्याचा केलं स्पष्ट.

– यासोबतच शपथपत्र आणि त्यावरच्या स्वाक्षऱ्या आणि शिक्के अतिशय अचूक आणि बरोबर असल्याचा दावा.

– 17 मतदारसंघातील आतापर्यंत जवळपास वीस उमेदवारांचे उमेदवारी अर्ज पुरावे म्हणून केलेत गोळा.

– 17 तारखेच्या सुनावणीवेळी 30 उमेदवारांच्या उमेदवारी अर्जाचे नमुने पुरावे म्हणून उच्च न्यायालयासमोर सादर करणार.

Viplav Bajoria: विप्लव बाजोरिया यांची प्रतिक्रिया

“मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत झाले आहे तेच आमच्यासोबत झाले आहे. माझा उमेदवारी अर्ज परिपूर्ण असतानाही तो का नाकारण्यात आला? असा दुजाभाव कशासाठी? अमरावतीच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या विरोधात कट केला. माझ्याकडे 17 उमेदवारी अर्ज आहेत. त्यामध्ये यवतमाळ आणि ठाण्याचे उमेदवार तर निवडून आले आहेत. अमरावतीचे निवडणूक अधिकारी मॅनेज आहेत,” असा आरोप विप्लव बाजोरिया यांनी केलाय.

Gopikishan Bajoria: गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतिक्रिया

“आमचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकत नाही. मी आणि मुलगा दोघेही वकील आहोत, आम्ही पाच निवडणुका लढलो आहोत. आम्हाला ‘इलेक्शन पिटीशन’मध्ये नक्की यश आणि न्याय मिळेल. त्यांनी गोलमाल करून विप्लव यांचा अर्ज बाद ठरवला. आमच्याप्रमाणेच उमेदवारी अर्ज भरलेला यवतमाळ, जळगावहिंगोली-परभणी, ठाणे, वर्धा येथील उमेदवारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत,” असे त्यांनी म्हटले.

गोपीकिशन बाजोरिया म्हणाले की, “आमचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी कुणाचा दबाव होता? आमचा उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. विधान परिषदेच्या 17 ही मतदारसंघात अगदी आमच्या उमेदवारी अर्जाप्रमाणे असलेले अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर हे फॉर्म वैध ठरवले असतील तर अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो रद्द कसा ठरवला? आमचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवताना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘मिरगी’ आली होती का? अमरावतीच्या ‘गोलमाल’चा डायरेक्टर कोण आहे?, हे सध्या काही कारणामुळे सांगू शकत नाही. आमच्याच उमेदवारी अर्जासारखे सतरा ते वीस पुरावे आमच्याकडे आहेत. इतर ठिकाणचे उमेदवारी अर्ज वैध असतील तर विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्जही वैध आहे. विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र आली. अमरावतीची सर्व निवडणूकच मॅनेज आहे. 27 तारखेच्या सुनावणीत हे सर्व पुरावे सादर करणार. विप्लव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे पक्ष सोबत आहे की नाही, या मुद्द्यावर बोलणार नाही.”

Amravati Vidhan Parishad Election 2026: न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष

या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि निवडणूक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जर इतर जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी तेच अर्ज वैध ठरवले, तर अमरावतीत वेगळा निकष का लावला गेला? हा बाजोरियांचा सवाल आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. 17 जून रोजी उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत बाजोरिया पिता-पुत्र हे सर्व पुरावे सादर करणार असल्याने, न्यायालय यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावती विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट! काँग्रेसचे हर्षजीत देशमुख थेट प्रचारात उतरणार नाही, नेमकं कारण काय?

Comments are closed.