‘पश्चिम बंगालमध्ये एकनाथ शिंदे नव्हते, तिथे समृद्धी महामार्ग नव्हता म्हणून…’; तृणमूलमधील फुटी
Sanjay Raut & मराठी: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात मोठी फूट पडली असून पक्षाचे बंडखोर खासदार केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर थेट ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) या पक्षात विलीन झाले आहेत. हे खासदार आता एनडीएला (NDA) पाठिंबा देणार असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घडामोडींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या गटावर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “कधी आपण या पार्टीचे नाव ऐकले आहे का? नॅशनल सिटीजन ऑफ इंडिया पार्टी. ही त्रिपुराची पार्टी आहे. या पार्टीला संपूर्ण त्रिपुरामध्ये 862 मते मिळाली आणि पश्चिम बंगालमध्ये या पक्षाने काही जागा लढवल्या, तिथे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांना हजार मतेदेखील पडली नाहीत. अमित शाह कुठून कुठून या पार्ट्या निर्माण करतात आणि पटलावर आणतात. एखाद्या गुलामाच्या हातापायात बेड्या बांधून कोठडीत ढकलावे, तसे या पक्षात ढकलतात. बावीस खासदार भाजपमध्ये जायला निघाले होते. त्यांना एनसीआयपी नावाच्या कुठल्यातरी पक्षात भाजपने विहिरीत ढकलल्यासारखे ढकलून दिले.
Sanjay Raut & मराठी: विलिनीकरण हाच पक्षांतराचा एकमेव पर्याय
पार्टी मर्ज झाल्यामुळे तृणमूल काँग्रेसवरील त्यांचा दावा आणि चिन्हावरील दावा संपलेला आहे. जे महाराष्ट्रात व्हायला पाहिजे होते. इथे एक न्याय वेगळा लागला आहे आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी घटना घडली आहे. विलिनीकरण हाच पक्षांतराचा एकमेव पर्याय आहे. महाराष्ट्रातील जो काही शिवसेना म्हणून घेणारा गट आहे, तो बेकायदेशीर आहे, असे आम्ही त्यासाठीच म्हणतो. तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तृणमूलमध्ये 60 पेक्षा जास्त आमदार फुटलेले आहेत आणि 20 पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. शिवसेनेत एवढे फुटले नव्हते. तरी त्यांना आपल्या खासदारांना वाचवण्यासाठी एका पक्षात विलीन व्हावे लागले, असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut & मराठी: पश्चिम बंगालमध्ये एकनाथ शिंदे नव्हते
संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात तुलनेत कमी आकडा असतानासुद्धा आजही ते शिवसेना म्हणून मिरवत आहेत, हे दुर्दैव आहे. याचे कारण असे की, महाराष्ट्रातील नेत्यांचा पैशांचा ओघ दिल्लीत जास्त गेला. पश्चिम बंगालमध्ये तुलनेत गरीब राजकारणी असल्यामुळे, तिथे कोणी एकनाथ शिंदे नसल्यामुळे, तसेच तिथे समृद्धी महामार्ग निर्माण झाला नसल्यामुळे ते त्या पद्धतीने दिल्लीत, न्यायव्यवस्थेत किंवा निवडणूक आयोगामध्ये पैशाचा ओघ वाहू शकले नाहीत. त्यामुळे त्या गरीब बिचाऱ्यांना कुठल्यातरी पक्षात ढकलून भाजपवाले मोकळे झाले. जर त्यांच्याकडे तेवढे पैसे असते आणि पैशाचा वापर झाला असता, तर तृणमूल पक्ष आणि चिन्हदेखील त्यांना मिळाले असते,” असे देखील त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Comments are closed.