वीस वर्षांपूर्वी भारत अत्यंत भ्रष्ट होता.
लंडनमधील घटना : सीजेपीने शेअर केला व्हिडिओ
वृत्तसंस्था/ लंडन
सरन्यायाधीश सूर्यकांत सध्या 6 दिवसांच्या लंडन दौऱ्यावर असून तेथील एका प्रख्यात विद्यापीठात आयोजित एका व्याख्यान कार्यक्रमात ते मुख्य वक्ते होते. या कार्यक्रमात सामील काही लोकांनी भारतात असहमतीचा आवाज दडपण्यात येत असल्याच्या कथित आरोपांवर सूर्यकांत यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. तर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने हे प्रश्न व्याख्यानाच्या विषयाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट केले.
सरन्यायाधीश सूर्यकांत हे लंडन विद्यापीठाच्या बिर्कबेक कॉलेजमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि आंतरराष्ट्रीय कायदा’ विषयावर व्याख्यान देत होते. कार्यक्रमादरम्यान प्रश्नोत्तराचे सत्र सुरू झाल्यावर एका महिलेने भारतातील लोकशाहीची स्थिती आणि असहमतीबद्दल वाढत्या शत्रुत्वाबद्दल प्रश्न विचारला. तर सूत्रसंचालकाने हा प्रश्न विषयाशी संबंधित नसल्याचे सांगत तिला रोखले. यादरम्यान एका विद्यार्थ्याने व्यासपीठाच्या दिशेने ओरडत ‘कृपया आम्हालाही काही सन्मान द्या’ असे म्हटले.
कार्यक्रमात गोंधळ सुरू असतानाच सरन्यायाधीशांनी एआयच्या भविष्यावर महत्त्वपूर्ण विचार मांडले. तंत्रज्ञान चांगले किंवा वाईट नसते, तर हे कोणता कायदा आणि नैतिक चौकटीत लागू करतो यावर याचा प्रभाव निर्भर असतो. एआयच्या शक्तीने घटनात्मक मूल्यं, लोकशाहीवादी वैधता आणि मानवी प्रतिष्ठेबद्दल उत्तरदायी असायला हवे. तांत्रिक प्रगती उत्तरदायित्व निश्चित न करण्यात आल्यास न्यायाची अवधारणा केवळ एक भ्रम ठरू शकते असा इशाराही सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिला.
कार्यक्रमातील गोंधळाच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचा (सीजेपी) मुख्य प्रवक्ता सौरव दास यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मागील महिन्यात बनावट पदवीधारक आणि कार्यकर्त्यांसाठी ‘कॉकरोच’ आणि ‘परजीवी’ यासारख्या शब्दांचा वापर केल्याच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी अस्तित्वात आली आहे. सीजेपी सध्या सीबीएसई ओएसएम वादावरून दिल्लीत मोठी निदर्शने करण्याची तयारी करत आहे.
Comments are closed.